आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • PM Vani Scheme For WiFi ‘Revolution’ : 1 Crore Data Centers Across The Country; No License, No Registration Required

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वायफाय ‘क्रांती’साठी पीएम वाणी योजना:देशभरात १ कोटी डेटा सेंटर्स; परवाना, नोंदणीची गरज नाही

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या योजनेमुळे देशात सार्वजनिक वायफाय कव्हरेज वाढण्यासह रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील

देशात डिजिटल क्रांतीला चालना देण्यासाठी पीएम-पब्लिक वायफाय अॅक्सेस नेटवर्क इंटरफेस (पीएम-वाणी) योजनेला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी सांगितले की, पीएम वाणी अंतर्गत पब्लिक डेटा ऑफिस (पीडीओ), पब्लिक डेटा ऑफिस अॅग्रिगेटर्स आणि अॅप पुरवठादारांचा समावेश असेल. पीडीओ एक छोटी दुकान वा सुविधा केंद्रही (सीएससी) असू शकत. त्यासाठी परवान्याची गरज नसेल, ना नाेंदणीची. तसेच त्यांच्याकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. देशभरात एक कोटी डेटा सेंटर उघडले जाणार असल्याचे माध्यमांच्या वृत्तांत म्हटले आहे.

पीडीओचे काम

पीडीओ हे वाणीच्या अनुरूप वायफाय अॅक्सेस पॉइंटची स्थापना, त्याचे मेंटेनन्स आणि ते चालवतील. तसेच ते ग्राहकांपर्यंत ब्रॉडबँड सेवाही पोहोचवतील.

भूमिका काय?

पब्लिक डेटा ऑफिस अॅग्रिगेटर (पीडीओए) मंजुरी व लेखाजोखा ठेवण्याचे काम करतील. सेंट्रल रजिस्ट्री पीडीआे, अॅप प्रोव्हायडर्स व पीडीओएच्या विवरणाचे काम पाहील.

असा होणार फायदा :-

सरकारनुसार, योजनेमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. देशात सार्वजनिक वायफाय कव्हरेज वाढण्यासह रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. लॉकडाऊन काळात विशेषत: ४ जी नेटवर्क नसलेल्या ठिकाणी इंटरनेटची मागणी वाढली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser