आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PMAY G । In The First Phase Of The Prime Minister's Housing Scheme, Modi Transferred Rs 700 Crore To The Accounts Of 1.47 Lakh Beneficiaries

घरकुल योजना:पंतप्रधान घरकुल योजनेचा पहिला हप्ता मिळाला, मोदींनी 1.47 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले 700 कोटी रुपये

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपुरातील घरकुल योजनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. 1 लाख 47 हजारांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यांवर घरकुलचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल लाभार्थ्यांना संवाद देखील साधला आहे.

घरकुल बांधणीसाठी पहिला हप्ता 38 हजार रुपयांचा देण्यात आला आहे. मोदींनी लाभार्थ्यांशी संवाद साधतांना विचारले की, तुमच्याकडून कोणी लाच घेतली तर नाही ना? अशी विचारपूस देखील मोदींनी केली आहे. आज दुपारी एक वाजता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आला.

एकूण 700 कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. या हप्त्याचे पैसे इतर कुठेही खर्च करू नका, घर बांधा, जसजसे बांधकाम सुरू होईल, त्यानंतर पुढचे हप्तेही लवकरच तुमच्या अकांउटला जमा होईल. असेही मोदी यांनी सांगितले.

पुढे मोदी म्हणाले की, तुमचा हक्क मिळवून देणे ही आमची जबाबदारी आहे. तसेच कोणीही तुमचा अधिकार हिरावून घेणार नाही. ग्रामसभेत नावाची घोषणा, निष्पक्षपणे सर्वे आणि थेट लाभ देण्याचे आदेश दिले आहे. यापुर्वीचे सरकार नागरिकांना टक्केवारीशिवाय लाभ देत नव्हते, मात्र आता तसे नाही. आम्ही जनेतला जास्तीत जास्त स्वत:च्या हक्काची घरे देण्याचे प्रयत्न करत आहोत.

बातम्या आणखी आहेत...