आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकच्या युद्धनौकेने मागील महिन्यात भारतीय सागरी हद्दीत घुसखोरी केली होती. पण तटरक्षक दलाच्या डॉर्नियर टेहळणी विमानाने त्याला पिटाळून लावले. यासंबंधीच्या माहितीनुसार, पाकिस्तानी नौदलाच्या पीएनएस आलमगीर युद्धनौकेने गुजरातलगतच्या भारतीय समुद्रात घुसखोरी केली होती. हे पाहून सागरी सीमेवर गस्त घालणाऱ्या डॉर्नियर विमानाने त्याला भारतीय हद्दीबाहेर जाण्याचा इशारा दिला.
या इशाऱ्याला पाकिस्तानी युद्धनौकेने कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. त्यामुळे डॉर्नियरने त्याला पिटाळून लावले. या घटनेप्रकरणी तट रक्षक दलाच्यावतीने अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आली नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार, कठोर कारवाईच्या भीतीने पाकिस्तानी युद्धनौका आल्यापावली पळून गेली.
रेडिओ संदेशाला उत्तर देत नव्हती युद्धनौका
पाकिस्तानी युद्धनौका आलमगीरने भारतीय हद्दीत घुसखोरी करताच भारतीय डॉर्नियर विमानाने त्याचा छडा लावला. त्यानंतर त्याने आलमगीरला माघारी परतण्याचा इशारा दिला. पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, डॉर्नियरने पाकिस्तानी जहाजाचा हेतू जाणून घेण्यासाठी रेडिओ संचार सेटवर कॉलही केला. पण पाकिस्तानी युद्धनौकेच्या कॅप्टनने कोणतेही उत्तर दिले नाही.
डॉर्नियरने आक्रमक उड्डाण करून पिटाळून लावले
अखेर पाकिस्तानी युद्धनौकेचा हेतू संशयास्पद दिल्यानंतर डॉर्नियरने त्याच्या समोरून 3 वेळा अॅग्रेसिव्ह फॉर्मेशन उड्डाण केले. यामुळे डॉर्नियरने आक्रमक भूमिका घेतल्याने समजल्याने पाकिस्तानी युद्धनौकेने तेथून पळ काढण्यात भले मानले. त्यानंतर डॉर्नियरने पाकिस्तानी युद्धनौका दूरवर जाईपर्यंत तिच्यावर नजर ठेवली.
अमेरिकेने पाकला दिले आहे आलमगीर
पाकिस्तानी नौदलाने आतापर्यंत आपल्या 3 युद्धनौकांना आलमगीर हे नाव दिले आहे. विद्यमान आलमगीर नामक युद्धनौका 2010 मध्ये अमेरिकेने पाकला दिली होती. 4100 टनी व 453 फूट लांब ही युद्धनौका अवघ्या 100 सेकंदांत 30 नॉट्सहून (सागरी मैल) अधिक वेग पकडू शकते. तिच्यावर 2 हेलिकॉप्टर तैनात करता येतात. अमेरिकेहून पाकमध्ये येताना या युद्धनौकेने स्पेन, तुर्की व सौदी नौदलासोबत युद्धाभ्यास केला आहे.
काही दिवसांपूर्वीच पोरबंदरला आले होत कोस्टगार्डचे DG
भारतीय तटरक्षक दलाचे महासंचाक जनरल व्ही. एस. पठानिया यांनी काही दिवसांपूर्वीच पोरबंदर क्षेत्राचा दौरा केला होता. त्यात त्यांनी किनारपट्टी भागाच्या निगराणीसाठी कोस्ट कार्डमध्य ध्रुव हेलिकॉप्टर्सचा समावेश केला होता. एअरक्राफ्ट व हेलिकॉप्टर्ससह कोस्ट कार्डचे अनेक जहाज रात्रंदिवस सागरी किनारपट्टीचे संरक्षण करतात, तिच्यावर नजर ठेवतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.