आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:कोरोनामुळे ​​​​​​​कवी कुंवर बेचैन यांचे निधन, कुमार विश्वास म्हणाले - 'कोरोनाने माझ्या मनाचा एक कोपरा मारुन टाकला'

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कवि कुमार विश्वास यांनी सोशल मीडियावर याची माहिती शेअर केली.

कोरोना संक्रमणामुळे गुरुवारी कवि कुंवर बेचैन यांचे निधन झाले. कुंवर बेचैन दिल्लीच्या एका रुग्णालयात दाखल होते. 12 एप्रिलला कुंवर बेचैन आणि त्यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. कवि कुमार विश्वास यांनी सोशल मीडियावर याची माहिती शेअर केली.

कुमार विश्वास यांनी लिहिले की, 'कोरोनाशी सुरू असलेल्या युद्धामध्ये भीषण दुःखद वृत्त मिळाले आहे. माझे कक्षा-गुरु, माझे शोध आचार्य, माझे चाचाजी, हिंदी गीतचे राजकुमार, असंख्य शिष्यांच्या जीवनात प्रकाश भरणारे डॉ. कुँअर बेचैन यांना काही मिनिटांपूर्वी देवाज्ञा झाली. कोरोनाने माझ्या मनाचा एक कोपरा मारुन टाकला.'

कुंअर बेचैन यांनी अनेक शैलींमध्ये साहित्य लिहिले आहे. त्यांचे गाणे संग्रह, गझल संग्रह, काव्यसंग्रह, महाकाव्य आणि कादंबरी प्रकाशित झाल्या आहे. डॉ कुंवर बेचैन यांचे खरे नाव डॉ कुंवर बहादुर सक्सेना होते. त्यांचा जन्म 1 जुलै 1942 रोजी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील उमरी या गावी झाला. त्यांचे बालपण चंदौसी येथे गेले. त्यांनी एम.कॉमसह (हिंदी) आणि एम.कॉम सह पीएचडीचा अभ्यास केला आहेत. त्यांनी गाजियाबादच्या एम.एम.एच महाविद्यालयामध्ये हिंदी विभागाध्यक्षच्या रुपात अध्यापनाचे काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...