आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Pokharan News : Two Children Of Bhadaria Brought Up The Bomb, Exploded In An Attempt To Remove The Scraps, One Killed, The Other Injured

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोखरण फायरिंग रेंजमध्ये दुर्घटना:दोन मुलांनी भंगार समजून उचलून आणला जिवंत बॉम्ब, उघडताना झाला स्फोट; एकाचा मृत्यू, एक जखमी

जोधपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
पोकरण फायरिंग रेंजमध्ये अशा चाचणीच्या वेळी उडालेल्या बॉम्बचे अवशेष ग्रामस्थ उचलून नेतात - Divya Marathi
पोकरण फायरिंग रेंजमध्ये अशा चाचणीच्या वेळी उडालेल्या बॉम्बचे अवशेष ग्रामस्थ उचलून नेतात
  • गंभीर जखमी झालेल्या मुलाला जोधपूर येथे रेफर करण्यात आले आहे

पोखरण फायरिंग रेंजमध्ये रविवारी एका बॉम्बस्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला आहे. दोन्ही मुले जवळीच भादरिया गावातील आहेत. दोन्ही मुले सकाळी पोखरणमध्ये फिरायला आले होते, येथे त्यांना एक बॉम्ब सापडला. मुले तो बॉम्ब खराब असल्याचे समजून घरी घेऊन आले आणि त्याला उघडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याचा स्फोट झाला. या दुर्घटने एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी मुलाला पोखरण येथे नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी जोधपुरला हलवण्यात आले.

पोखरण देशातील सर्वात मोठी फायरिंग रेंज आहे. येथे सैन्य 12 महिन्या सैन्याचा युद्ध सराव सुरू असतो. सराव दरम्यान मोठ्या प्रमाणात दारुगोळा वापरला जातो. आजूबाजूच्या गावातील लोक तारबंदी नसल्यामुळे या क्षेत्रात प्रवेश करतात आणि बॉम्बचे भंगार काढून घेतात. माहिती अभावामुळे अनेकवेळा जिवंत बॉम्ब देखील नेले जातात. यातील भंगार काढताना अपघात होतो. यापूर्वीही असे अनेक अपघात झाले आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser