आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतसर:सोशल मीडियावर पाक तरुणाने आग्य्रातील विवाहितेशी रचले प्रेमाचे नाटक, लग्नाच्या तयारीतील तरुणीला पोलिसांनी पकडले

अमृतसरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानच्या तरुणाने लुडो खेळताना विवाहितेला ओढले होते प्रेमाच्या जाळ्यात

सोशल मीडियावर बहरलेले प्रेम अनेकदा माणसाला अडचणीत टाकते आणि हे प्रेम भारत आणि पाकिस्तानच्या तरुण-तरुणीत असेल तर संकट आणखी गडद होते. पोलिसांनी पाकिस्तानी तरुण आणि आग्र्यातील विवाहितेचे प्रेम प्रकरण उघड केले आहे. तरुणी आपला एकुलता एक मुलगा आणि कुटुंबाला सोडून अमृतसरपर्यंत पोहोचली होती. त्यादरम्यान पंजाब पोलिसांचे लक्ष महिलेवर गेले आणि त्यांनी तिला ठाण्यात घेऊन आले. २४ वर्षीय सपनाचे (नाव बदलले आहे) माहेर राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात आहे. तिचे लग्न आग्र्यातील रमेशशी (बदललेले नाव) ४ वर्षांपूर्वी झाले होते. रमेश कॉस्मेटिकचा व्यवसाय करतो. पाचवी शिकलेली सपना म्हणाली की, तिचा अडीच वर्षांचा एक मुलगा आहे. ती मोबाइलवर लुडो खेळताना लाहोरच्या अली नावाच्या तरुणाशी संपर्कात आली. १० दिवसांपूर्वी अलीने सांगितले होते की, तो तिच्या प्रेमात पडला असून लग्न करू इच्छित आहे. त्याने तिला असे काही जाळ्यात ओढले की सपना सर्व सोडून लग्नास तयार झाली होती.

असा प्रकार समोर आला
जालियनवाला बाग पोलिस पोस्टचे इन्चार्ज एएसआय रणजितसिंग, एएसआय बलजिंदरसिंग, हेड कॉन्स्टेबल गुरमितसिंग तेथे कर्तव्यावर होते. रणजित यांनी सांगितले की, सकाळी-सकाळी सपना ऑटो रिक्षावाल्यांना सीमेवर जाण्याबाबत विचारणा करत होती. मात्र, रिक्षावाले तयार नव्हते. रडवेल्या अवस्थेतील तिच्याकडे लक्ष गेल्यानंतर आॅफिसमध्ये बोलावून चौकशी सुरू केली. यानंतर तिने सर्व प्रकार सांगितला. तिला जाळ्यात ओढले गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिस आयुक्तांनी सांगितले की, यादरम्यान मुलीच्या माहेरी आणि पतीच्या कुटुंबीयांना फोन करून बोलावले. यानंतर महिलेला कुटुंबासोबत पाठवण्यात आले.

न सांगता घरातून निघाली होती विवाहिता, अटारीत भेट होणार होती
सपनाने पोलिसांना सांगितले की, अलीने तिला मंगळवारी सकाळी फोन करून बसने अमृतसरला आणि तेथून ऑटोने अटारी सीमेवर येण्यास सांगितले. तेथून तो तिला घेऊन जाणार होता. ती मंगळवारी निघाली आणि बुधवारी सकाळी जालियनवाला बाग गेटवर आली.

बातम्या आणखी आहेत...