आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराAIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेचे प्रत्येत पदर उकलायला पाहिजे, मात्र पोलिसांकडून हा गुंता अधिकच वाढवला जात आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज काही वेगळेच सांगत आहे, ओवेसी यांच्या वक्तव्यातून आणि ट्विटमधून वेगळेच काही समोर येत आहे. त्याचवेळी, 12 तासांनंतर पिलखुआ पोलिस ठाण्यात बनवलेली कथा (दुसरी एफआयआर) दोघांपेक्षाही वेगळी आहे.
तिन्ही कथांचा एकमेकांसोबत जराही संबंध जुळत असल्याचे दिसत नाही. सर्वांच्या गोष्टी या विरोधाभासी आहेत. ओवेसींच्या ट्विटमध्ये एक पिस्तूल घटनास्थळी पडलेली पाहायला मिळाली होती. तर पोलिसांनी रेकॉर्डमध्ये लिहिले की, दोन्ही हल्लेखोरांकडून पिस्तूल जप्त केली आहे. अशा वेळी आता हे प्रकरण कोर्टात येईल तर या संशयाचा फायदा हल्लेखोरांना मिळणार हे नक्की आहे. सध्या या संशयाचा फायदा राजकीय पक्ष उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र उत्तर प्रदेशच्या समजदार जनतेला सर्व काही कळते.
काय सांगतात CCTV चे चित्र
शुभमने पहिली गोळी, सचिनने नंतर दुसरी गोळी झाडली. या घटनेचे दोन फुटेज समोर आले आहेत. दोघांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोर बूथच्या पुढे होते आणि ओवेसींची गाडी मागे. पहिले, शुभम लाल रंगाच्या हुडीमध्ये गोळी झाडताना दिसतो, जो नंतर एका पांढऱ्या कारला धडकताना दिसतो. ही गाडी ओवेसींची नाही. त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या हुडीमध्ये सचिनने दुसऱ्या वाहनावर गोळ्या झाडल्या. ती ओवेसींची गाडी असू शकते. त्यानंतर दोघे पळून जातात.
काय सांगतात ओवेसींचे जबाब?
बॅरियरपूर्वी फायरिंग झाली, स्फोट झाल्यानंतर काय झाले असे विचारल्यावर यामीन म्हणाला- भाई, हल्ला झाला आहे. पाहिले तर रेड हुडीवाला गोळ्या झाडत होता. यामीनने गाडीला धडक दिली आणि आमची गाडी पुढे वळवली. पांढऱ्या रंगाच्या हुडीतल्या माणसाने आमच्या मागून येणाऱ्या फॉर्च्युनरवर गोळीबार केला. ओवेसी यांनी रात्री 9 वाजता हल्ल्याचे ट्विट केले, रात्री 9.49 वाजता आणखी एका ट्विटमध्ये टोल बूथवर घटनास्थळी एक पिस्तूल टाकण्यात आल्याचे सांगितले. ज्यावर कलावा बांधलेला नव्हता.
पोलिसांचा दुसरा FIR : दोघांनीही एकत्र गोळ्या झाडल्या, दोघांकडून पिस्तूल जब्त केली
यामीनने 3 फेब्रुवारीच्या रात्री 9.35 ला हल्ल्याचा FIR नोंदवला. तपास करणारे अधिकारी अभिनंदर पुंडीर यांनी 12 तासांनंतर सकाळी 9.32 वाजता आपल्याकडून दुसरा FIR (0046) नोंदवला. यानुसार, रात्री 11 वाजता सचिनला पकडले तेव्हा त्यांच्या ताब्यातून कलावा बांधलेली पिस्तुल जब्त केली. नंतर सकाळी 4 वाजता शुभम पकडला गेला तेव्हा त्याने उसाच्या शेतात लपवलेली आपली पिस्तुल जप्त करुन दिली. दोघांनीही एकत्र गोळ्या झाडल्या, सचिनला गोळ्या झाडताना ओवेसींनी पाहिले होते. यामुळे ते खाली वाकले तेव्हा सचिनने खाली फायरिंग केली.
या कहाणीत काही तरी झोल दिसतोय, 6 खोट्या गोष्टी तर स्पष्ट दिसत आहेत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.