आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Police Issued A Lookout Notice Against Two Time Olympic Medalist Sushil Kumar, Why Is Sushil Absconding? What Is The Whole Matter?; News And Live Updates

एक्सप्लेनर:दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार फरार; पोलिसांनी बजावली लुकआउट नोटीस, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

एका महिन्यापूर्वीलेखक: जयदेव सिंह
  • कॉपी लिंक
  • पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडितांना जबरदस्तीने स्टेडियमच्या आत नेऊन पार्किंग क्षेत्रात मारहाण केली.

दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता रेसलर सुशील कुमारच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी लुकआऊट नोटीस बजावली आहे. सुशीलवर दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या चकमकीत सामील असल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये 23 वर्षीय माजी ज्युनियर नॅशनल रेसलिंग चॅम्पियन ठार झाला होता. त्यामुळे गेल्या एक आठवड्यापासून दिल्ली पोलिस सुशीलच्या शोधात ठिकठिकाणी छापे टाकत आहे.

तथापि, हे संपूर्ण प्रकरण काय आहे ? सुशीलवर कोणते आरोप आहेत? कशाबद्दल वाद झाला होता? मेलेला रेसलर (कुस्तीपटू) कोण होता? या प्रकरणात सुशील आणि त्याच्या कुटुंबाचे काय म्हणणे आहे? याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत कोणती कारवाई केली? चला जाणून घेऊया ...

संपूर्ण प्रकरण काय आहे?
छत्रसाल स्टेडियममध्ये 4 मे रोजी मध्यरात्री कुस्तीपटूंच्या दोन गटात वाद होत मारहाण झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना स्टेडियमच्या पार्किंग क्षेत्रात मध्यरात्री 1.15 ते 1.30 दरम्यान घडली असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तेथे 5 वाहने उभी असल्याचे आढळले.

दरम्यान, या झालेल्या मारहाणीत सागर धनखार (वय 23), सोनू महल (वय 37) आणि अमित कुमार (वय 27) आणि इतर दोन कुस्तींपटू गंभीर जखमी झाले. तर उपचारादरम्यान, सागर यांचा मृत्यू झाला होता. मृतक सागर हा माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन आणि दिल्ली पोलिसातील हेड कॉन्स्टेबल यांचा मुलगा होता. तर दुसरीकडे सोनू महल हा गुंड जथेडीचा सहकारी असून यापूर्वी त्याला खून आणि दरोडा प्रकरणात अटक करण्यात आली होती.

कशाबद्दल वाद झाला होता?
सांगण्यात येत आहे की, मृतक सागर आणि त्याचे मित्र ज्या घरामध्ये राहत होते ते घर रिकामा करण्यासाठी सुशील सागरवर दबाव आणत होता. त्यामुळे याचे भांडणात रुपांतरण झाले. ज्यामध्ये सागरला आपले प्राण गमवावे लागले होते.

सुशील आणि त्याच्या कुटुंबाचे काय म्हणणे आहे?
फरार होण्यापूर्वी सुशीलने संबंधित प्रकरणात स्पष्ट सांगितले होते की, माझा आणि या स्टेडियमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून मृतक सागर माझा सहकारी नाही. तसेच या घटनेबाबत पोलिसांना काही लोक आमच्या क्षेत्रात येऊन भांडण करत असल्याचे सुशीलने सांगितले होते.

तर दुसरीकडे, त्यांच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की, सुशील फरारी नसून त्याचे नाव या प्रकरणाशी चुकीच्या पद्धतीने जोडले जात आहे. तो सध्या अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी कायदेशीर सल्ला घेत असल्याचे कुटुंबाने सांगितले.

पोलिसांनी आतापर्यंत कोणती कारवाई केली?
या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळावरुन 5 वाहनांसह एक भरलेली डबल बॅरेल गन आणि 3 जिवंत काडतूस जप्त केले आहे. दरम्यान, पोलिसांनी सुशीलचा साथीदार प्रिन्स दलालसह दोन पैलवानांना ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्यानंतर पोलिसांकडून प्रिन्स दलालला अटक करण्यात आली.

सुशील अटक करण्यासाठी पोलिसांनी दिल्ली-एनआरसीसह शेजारच्या अनेक राज्यांत छापेमारी केली. परंतु, पोलिसांना अद्यापही सुशील पकडण्यात यश आले नाही. पोलिसांनी या प्रकरणात सुशीलच्या सासर्‍यासह कोच सतपाल आणि कुटुंबातील सदस्य आणि ओळखीच्या लोकांचीही चौकशी केली आहे.

मृतक सागरच्या कुटुंबाचे काय म्हणणे आहे?
सुशील संबंधित प्रकरणात घटनास्थळावर उपस्थित असून तो या चकमकीत सामील असल्याचा दावा सागरच्या कुटुंबियानी केला आहे. परंतु, पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडितांना जबरदस्तीने स्टेडियमच्या आत नेऊन पार्किंग क्षेत्रात मारहाण केली. यावेळी सुशीलदेखील तेथे उपस्थित असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. पोलिस यामध्ये सुशीलची भूमिका काय होती याचा शोध घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...