आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Police Raids To Trace Olympian Wrestler Sushil Kumar Named In Murder Case At Delhi Chhatrasal Stadium

सुशीलच्या शोधात दिल्ली पोलिस:ऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्तीपटू विरोधात गुन्हा दाखल, अनेक ठिकाणी छापेमारी; माजी ज्यूनिअर नॅशनल चॅम्पियनच्या हत्येत सामिल असल्याचा आरोप

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटनास्थळावरुन डबल बॅरल गन आणि कारतूस आढळले आहेत

दिल्ली पोलिस दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेते राहिलेल्या कुस्तीपटू सुशील कुमार याचा शोध घेत आहेत. माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागरची हत्या आणि छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या वादात सामील असल्याचा आरोप सुशीलवर आहे. त्याच्याविरूद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिस याप्रकरणी विविध ठिकाणी छापे टाकत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेपासून सुशील बेपत्ता आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?
प्रकरण दिल्लीतील मॉडेल टाऊन परिसरातील छत्रसाल स्टेडियमचे आहे. मालमत्तेच्या वादावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. सागर आणि त्याचे मित्र ज्या घरात राहत होते, सुशील ते घर रिकामे करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत होता. यामुळे मंगळवारी उशिरा कुस्तीपटूंचे दोन गट स्टेडियमच्या आत एकमेकांशी भिडले. यात 5 कुस्तीपटू जखमी झाले. त्यातील एका सागरचा (वय 23) रूग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. तो दिल्ली पोलिसात हेड कॉन्स्टेबलचा मुलगा होता.

स्टेडियमच्या पार्किंग एरियामध्ये फायरिंग झाली
पोलिसांनुसार, घटना रात्री जवळपास 1.15 ते 1.30 च्या दरम्यान स्टेडियमच्या पार्किंग परीसरात झाली. सूचना मिळताच पोलिस घटनास्थली पोहोचले, तेव्हा तेथे 5 गाड्या उभ्या दिसल्या. सागर आणि त्याच्या 4 इतर कुस्तीपटू मित्रांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये सोनू (37), आमित कुमार (27) आणि 2 इतर कुस्तीपटूंचा समावेश होता.

घटनास्थळावरुन डबल बॅरल गन आणि काडतूस आढळले आहेत
पोलिसांना घटनास्थलावरुन 5 गाड्यांव्यतिरिक्त एक लोडेड डबल बॅरल गन आणि 3 जिवंत काडतूस मिळाले आहेत. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ते सुशील कुमारच्या भूमिकेचा तपास करत आहेत. कारण त्यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. सध्या प्रिंस दलालसह दोन कुस्तीपटूंना अटक करण्यात आली आहे आणि त्यांची चौकशी केली जात आहे.

सुशीलने आरोप फेटाळून लावले
यापूर्वी सुशीलने या प्रकरणात स्पष्टीकरण दिले. त्याने म्हटले की, ते आमचे सोबतचे कुस्तीपटू नव्हते. घटना रात्री उशीरा घडली. आम्ही पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिली होती की, काही अज्ञात लोक आमच्या परीसरात घुसून भांडण करत आहेत. या घटनेशी आमच्या स्टेडियमचा काहीच संबंध नाही. सुशीलने 2012 च्या लंडन ओलिंपिकमध्ये सिल्वर आणि बीजिंग ओलंपिकमध्ये ब्रॉन्ज मेडेल जिंकले होते.

बातम्या आणखी आहेत...