आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Police Released Photos Of 40 Suspects In The Kanpur Riots, Latest News And Update

कानपूर हिंसाचाराच्या संशयितांचे फोटो उजेडात:पोलिसांनी 40 दंगेखोरांचे फोटो केले जारी; म्हणाले - आणखी चेहरे येणार उजेडात

कानपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिसांनी कानपुरात 3 जून रोजी हिंसाचार करणाऱ्या संशयितांचे पहिले पोस्टर जारी केले आहे. या पोस्टरमध्ये 40 आरोपींचे फोटो आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, हे सर्वजण शहरातील नव्या रस्त्यावर झालेल्या दंगलीचे आरोप आहेत. पोलिस हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल करुन त्यांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. अन्य आरोपींचे पोस्टरही लवकरच जारी केले जाईल. नव्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर दंगेखोरांची ओळख पटवण्यात आली. त्यानंर त्यांचे नाव व पत्ता शोधून ते पोस्टरच्या रुपात जारी करण्यात आले आहे.

3 जून रोजी काय घडले होते?

कानपूरच्या बेकनगंजमध्ये 3 जून रोजी सकाळपासूनच भयावह शांतता होती. या भागातील मुस्लिम दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. पण, यतीमखान्यालगतच्या बाजारपेठेतील काही हिंदू दुकानदारांचा व्यवहार सुरू होता.

दुपारी 1.45 वा. यतीमखान्यालगतच्या मशिदीत शुक्रवारचा नमाज अदा करण्यात आला. 2.30 वा. लोक मशिदीबाहेर पडले. त्यांनी बाजारातील दुकाने जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केला. हिंदू दुकानदारांनी त्यास नकार दिला असता काही समाजकंटकांनी सर्वप्रथम चंद्रेश्वरच्या हातात शिरुन दगडफेक केली. यामुळे स्थिती चिघळली. याचवेळी गर्दीतील काही संशयितांनी गोळीबार केला.

दुपारी 3 च्या सुमारास घडलेल्या या घटनेने आता दंगलीचे वळण घेतले होते. पाहता पाहता परेड चौकात जवळपास 1 हजार लोक जमले. गोंधळ सुरू झाल्यानंतर स्थिती वेगाने बदलली. पोलिसांना अरुंद गल्ल्यामुळे संशयितांची वेळीच धरपकड करता आली नाही.

कानपूर शहरातील एका भींतीवर पोस्टर लावताना पोलिस कर्मचारी.
कानपूर शहरातील एका भींतीवर पोस्टर लावताना पोलिस कर्मचारी.

प्रेषितांवरील वादग्रस्त विधानानंतर उसळली दंगल

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेटध्ये मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. यामुळे मुस्लिम समुदायातील लोक नाराज होते. ते यतीमखान्यालगतच्या सद्भावना चौकालगतची बाजारपेठ जबरदस्तीने बंद करत होते. तेव्हा दोन समुदाय एकमेकांपुढे आल्यामुळे दगडफेक झाली.

शुक्रवारच्या नमाजानंतर बहुतांश मशिदींत पैगंबरांवरील आक्षेपार्ह विधान सहन करणार नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. यामुळे तणाव निर्माण होऊन दंगल उसळली. पोलिसांनी नमाजानंतर निदर्शने करण्याची परवानगी दिली नव्हती. त्यानंतरही लोक रस्त्यावर उतरले.

3 जून रोजी कानपूरच्या बेकनगंजमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर रस्त्यावर उतरलेल्या लोकांनी अचानक दगडफेक सुरू केली.
3 जून रोजी कानपूरच्या बेकनगंजमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर रस्त्यावर उतरलेल्या लोकांनी अचानक दगडफेक सुरू केली.

कानपूर शहरात 4 तास चालला हिंसाचार

परेड चौकात जमाव जमल्यानंतर स्थिती वेगाने बिघडली. पोलिसांना अरुंद गल्लीबोळांत जाता येत नव्हते. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल 4 तास लागले. पोलिसांनी या प्रकरणी 18 जणंना ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत.

हे पोस्टर शहरातील बाजारपेठेत लावण्यात आले होते. त्यात 3 जून रोजी बंद व 5 जून रोजी जेल भरो आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते.
हे पोस्टर शहरातील बाजारपेठेत लावण्यात आले होते. त्यात 3 जून रोजी बंद व 5 जून रोजी जेल भरो आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...