आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Policy Commission Members Say There Is No Need To Worry If Different Vaccines Are Taken In Both Doses

लसीकरण:नीती आयोगाचे सदस्य म्हणाले- दोन्ही डोसमध्ये वेगवेगळ्या व्हॅक्सिन घेतल्यास काळजीचे कारण नाही, काही देशात व्हॅक्सिन मिक्सिंग ट्रायल सुरु आहेत

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या आणि दुसर्‍या डोसमध्ये वेगवेगळ्या लस घेतल्यामुळे प्रचंड गोंधळ सुरु आहे, यातच सरकारची भूमिका चकित करणारी आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के पॉल यांनी मंगळवारी सांगितले की, दोन डोस वेगवेगळ्या व्हॅक्सिनचे दिले गेले असल्यास काळजी करण्याची गरज नाही.

डॉ. व्ही.के. पॉल म्हणाले की, लसीकरणाच्या बाबतीत आमचा प्रोटोकॉल स्पष्ट आहे. दोन्ही डोस एकाच व्हॅक्सिनचे दिले जातील. वेगवेगळे डोस दिले गेले असल्यास त्याची चौकशी केली जाईल. पुढे ते म्हणाले की, जरी असे काही झाले असेल तर त्या व्यक्तीला काळजी करण्याची गरज नाही.

व्हॅक्सिनच्या मिक्स डोसचे ट्रायल सुरु
ते म्हणाले, 'व्हॅक्सिनचे मिक्सिंग असा महत्त्वाचा मुद्दा असू नये. असेही म्हटले जाते की, जर लस बदलून घेतली तर इम्युनिटी वाढते. परंतु सध्या आम्ही याकडे त्या दृष्टीने पाहत नाहीत. काही देशांमध्ये, याविषयी जे घडले आहे ते केवळ ट्रायल बेसवर झाले आहे. ट्रायलमध्ये दिसून येत आहे की, व्हॅक्सिन मिक्स केल्यास काय फायदा होतो."

बातम्या आणखी आहेत...