आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Political : Congress Working Committee Meeting News And Updates Sonia Gandhi, Rahul Gandhi,

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळणार?:समितीच्या बैठकीत सोनिया यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर सहमती दर्शवली; म्हणाल्या - नवीन पक्षाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू करा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशोक गहलोत, अमरिंदर सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधींवर विश्वास व्यक्त केला
  • सोनिया गांधी यांनी 10 ऑगस्ट रोजी अंतरिम अध्यक्ष म्हणून एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला

सोमवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सहमती दर्शवली. सोनिया म्हणाल्या की, नवीन अध्यक्ष निवडण्याची तयारी सुरू करा. मीडिया रिपोर्ट्स नुसार, या दरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि ज्येष्ठ नेते ए.के. अॅटनी यांनी त्यांना पद सोडू नये अशी विनंती केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही ही बैठक होत आहे.

मीडिया रिपोर्ट्स नुसार, सोनिया गांधी यांनी रविवारी देखील नवीन अध्यक्ष शोधण्यास पक्षातील नेत्यांना सांगितले होते. राहुल गांधींनी यापूर्वीच पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया यांनी ऑगस्टमध्ये एक वर्षासाठी अंतरिम अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.

अपडेट्स

सीडब्ल्यूसीच्या बैठकीला सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियंका गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यासह 40 हून अधिक नेते उपस्थित आहेत.

मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडे अनेक पात्र उमेदवार आहेत. यात राहुल गांधी, प्रियंका गांधी, रेहान वड्रा आणि मिराया वाड्रा यांचा समावेश आहे. कार्यकर्त्यांनी हे समजले पाहिजे की काँग्रेस एका शाळेसारखी आहे जिथं वर्गात फक्त मुख्याध्यापकांची मुलं अव्वल येतात.

सोमवारी सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीत पक्ष मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. ते म्हणाले की गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती अध्यक्ष झाला तर पक्षात फूट पडेल.

राहुलला विरोध

पाच पानांचे हे पत्र आहे. यात दोन ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला संजीवनी देण्याचा मसुदा तयार केला आहे. यात थेट सोनिया आणि राहुल यांच्यावर टीका नाही, परंतु पक्षश्रेष्ठी विशेषत: राहुल यांच्याविरोधात रोख असल्याचे दिसते.

राहुल, प्रियंका गांधींचा नकार

राहुल आणि प्रियंका गांधी यांनी यापूर्वीच अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष असावा असे दोघांनी स्पष्ट केले आहे. परंतु नेतृत्वाच्या मुद्द्यावरून पक्षात सरळ सरळ दोन तट पडले असताना सोनियांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचे संकेत दिले आहेत. गांधी परिवाराबाहेरील अध्यक्ष हवा अशी एका गटाची मागणी आहे, तर दुसऱ्या गटाला गांधी घराण्यातील सदस्य अध्यक्ष म्हणून हवा आहे.

या आहेत मागण्या : पक्षाला संजीवनी देण्यासाठी फील्डवर सक्रिय अध्यक्ष हवा

पक्षाला संजीवनी देण्यासाठी सक्रिय आणि प्रभावी नेतृत्वाची गरज आहे म्हणून पूर्णवेळ अध्यक्ष हवा आणि तो फील्डवर सक्रिय असावा.काँग्रेस कार्यकारिणीची निवडणूक घेण्यात यावी. राज्यांमधील नेतृत्वाला अधिक स्वातंत्र्य दिले जावे. पक्षाला नव्या जोमाने उभे करण्यासाठी व मार्गदर्शन मिळण्यासाठी नेतृत्वाची संस्थात्मक यंत्रणा तयार करावी. कार्यक्रम निश्चित करून भाजपला घेरण्याची व्यूहरचना तयार करावी.

> पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे दोघेही गांधी घराण्यातीलच अध्यक्ष असावा यासाठी आग्रही आहेत.

> ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी सर्व सहमतीने अध्यक्ष निवडला जावा असे मत व्यक्त केले. तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राहुल यांना पुन्हा अध्यक्षपद देण्याची मागणी केली.

या आहेत शक्यता :

१. पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल अध्यक्षपदासाठी राहुल यांच्या नावाचा प्रस्ताव मांडू शकतात.

२. मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खरगे किंवा मुकुल वासनिक यांची हंगामी अध्यक्षपदी निवड होऊ शकते