आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​धनखडांचा ब्रेकफास्ट म्हणजे रात्रीची शिळी पोळी:फाडफाड इंग्रजी बोलणारे गावातील पहिले व्यक्ती; आज उपराष्ट्रपतीपदासाठी मैदानात

मनीष व्यास5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखड राजस्थानच्या झुंझुनू गावचे रहिवासी आहेत. त्यांचा आजही आपल्या गावाशी संपर्क आहे. गावात शिरताच धनखड यांचे भव्य फार्म हाऊस दिसते. दिव्य मराठीची टीम तिथे पोहोचली तर फार्म हाऊसमध्ये रांगेत बांधण्यात आलेल्या 5 खोल्यांत महिलांची गर्दी होती. तिथे राहणाऱ्या महिपालने सांगितले की, भाऊसाहेब (धनखड) व भाभींनी (सुदेश धनखड) 2008 मध्ये येथे महिलांसाठी मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्र उघडले होते.

हेच जगदीप धनखड आज उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी एनडीएचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. त्यांना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांनी आव्हान दिले आहे. बहुतांश विरोधी पक्षांनी अल्वांना पाठिंबा दिला आहे. पण धनखड यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

महिपाल यांनी सांगितले, 'धनकड यांनी येथे मुलांसाठी स्पोकन इंग्लिशचे वर्ग व कॉम्यूटर कोर्स सुरू केला. येथे एक ग्रंथालयही स्थापन केले. त्याचे कामकाज सध्या भाभी पाहतात. त्या दर 2 दिवसांनी फोन करून स्टाफकडून पूर्ण माहिती घेतात.'

शिलाई मशिनच्या केंद्रात पोहोचताच इंस्ट्रक्टर सविताशी भेट झाली. सविता म्हणाल्या - '15 वर्षांत आतापर्यंत 2500 हून अधिक महिलांना येथे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. या महिला आता स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. गरजवंत महिलांना येथे मोफत शिलाई मशिनही दिले जाते. ट्रेनिंगच्या कालावधीत महिलांना कापड किंवा इतर वस्तू घेण्यासाठी कोणताही खर्च करण्याची गरज नाही.'

गावात संगणक प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय

ट्रेनिंग सेंटरमधून बाहेर पडल्यानंतर तिथे आणखी काही खोल्या आढळल्या. महिपाल यांनी सांगितले, 'धनखड फाडफाड इंग्रजी बोलणारे पहिले व्यक्ती होते. त्यांची गावातील प्रत्येकाने इंग्रजी बोलावे अशी इच्छा आहे. यासाठी त्यांनी काही वर्षांपूर्वी गावातील एका खोलीत स्पोकन इंग्लिश क्लासेस व दुसऱ्या खोलीत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्यांनी येथे एक ग्रंथालयही सुरू केले आहे. तिथे सर्वच प्रकारची पुस्तके आहेत.'

फार्म हाऊसमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही गावात गेलो. एका गो शाळेजवळ पोहोचल्यानंतर त्याचेही बांधकाम धनखड स्वतः करत असल्याचे समजले. गो शाळेत उपस्थित ब्रजलाल योगींनी सांगितले की, फेब्रुवारीत येथे धनखड येथे आले होते. तेव्हा त्यांनी गो शाळेत एक मोठे व पक्के चारा भंडार, भिंती, गेट व अन्य काही बांधकाम केले. त्यानंतर तत्काल हे बांधकाम सुरू केले.

दही व रात्रीच्या शिळ्या पोळीने ब्रेकफास्ट

महिपाल यांनी सांगितले की, ते अनेक वर्षांपासून जगदीप धनखड यांच्यासोबत आहेत. धनखड भलेही सुप्रीम कोर्टाचे मोठे वकील, मंत्री व बंगालचे राज्यपाल असतील, पण आजही त्यांची राहणी अत्यंत साधी आहे. त्यांची दिनचर्या व खाणेपिण्याचे रुटीन फिक्स आहे. ते दररोज पहाटे 5 वाजता उठतात. त्यानंतर योग व व्यायाम करतात. त्यानंतर स्नान करून ठाकूरजी यांची पूजा करतात.

अनेक वर्षांपासून त्यांना हेच खाताना पाहतो. दुपारच्या जेवणात ते चपाती व भाजी घेतात. सायंकाळी खिचडी किंवा लापशी खातात. भाभींच्या हातचा चूरमाही त्यांना फार प्रिय आहे.

याच हवेलीत ठरली निवडणुकीची रणनीती

गावाच्या मध्यभागी धनखड यांची वडिलोपार्जित हवेली आहे. येथेच त्यांचा, त्यांचे दोन्ही बंधू कुलदीप व रणदीप तथा बहिण इंद्राचा जन्म झाला. 1989 मध्ये धनखड यांनी झुंझुनूतून पहिली निवडणूक लढली. तेव्हा ते याच हवेलीतून निवडणुकीची रणनिती ठरवत होते.

बाहेर प्रकाश धनखड नामक तरुण आढळला. त्याने आम्हाला हवेली दाखवली. हवेली आता मोडकळीस आली आहे. तिच्या बाहेर सर्वत्र गवत उगवले आहे.

प्रकाशने सांगितले की, जगदीप धनखड यांचे चुलते हरिबक्ष चौधरी अनेक वर्ष सरपंच होते. त्यांचा गावावर वचक होता. धनखड यांचे वडील गोकूळराम चौधरी हे रेल्वेचे मोठे ठेकेदार होते. धनखड यांचे बालपण येथेच गेले. त्यांचे आईवडील केसरदेवी व गोकूळराम चौधरी यांचा बहुताश काळ याच हवेलीत गेला. पण आता अनेक वर्षांपासून येथे कुणीही राहत नाही.

गावात असले की दिवसातून दोनवेळा मंदिरात येतात

हवेलीतून बाहेर पडल्यानंतर जवळच्याच एका गल्लीत ठाकूरजी यांचे भव्य मंदिर आहे. धनखड आपल्या मातोश्री केसर देवी यांच्यासोबत येथे रोज येत असत. पुजारी सज्जनदास यांनी सांगितले की, आजही गावात असताना ते दिवसातून दोनवेळा ते मंदिरात येतात. येथे तासंनतास बसतात. गावातून जातानाही ते ठाकूरजींचे दर्शन घेतात.

याच मंदिरात जगदीप धनखड गावात आल्यानंतर तासनतास बसतात. गावातून जातानाही ते येथे येऊन दर्शन घेतात.
याच मंदिरात जगदीप धनखड गावात आल्यानंतर तासनतास बसतात. गावातून जातानाही ते येथे येऊन दर्शन घेतात.

गावापासून जवळपास 3 किमी अंतरावर धनखड यांची वडिलोपार्जित शेती आहे. तिथे जवळपास 60 बीघा शेतात जोजोबाची शेती आहे. 2012 मध्ये धनखड यांनी येथे जोजोबाचे 9,500 रोपटे लावले होते. धनखड यांचे या शेतीवर जातीने लक्ष असल्याचे महिपाल यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...