आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयास्पद मृत्यू:ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख यांचा संशयास्पद मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

अहमदनगर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शवविच्छेदनानंतरच समोर येईल मृत्यूचे नेमके कारण

ज्येष्ठ राजकीय नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा आणि आणि यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख (वय 35) यांचे शनिवारी सायंकाळी यशवंत कॉलनीतील त्यांच्या राहत्या घरी संशयास्पदरीत्या निधन झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गौरी गडाख यांना घराजवळील जवळील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे निष्पन्न झाले. यासंदर्भात तोफखाना पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिकारी तातडीने संबंधित रुग्णालयात व तिथून गडाख यांच्या निवासस्थानी दाखल झाले. गौरी गडाख यांच्या मृत्यूचे निश्चित कारण समजू शकले नाही. रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे नगर जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...