आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Political Parties Upset With Announcement Of Inclusion Of 25 Lakh New Voters In Jammu And Kashmir, Opposition To Meet On August 22

राजकीय भूकंप:जम्मू-काश्मीमध्‍ये 25 लाख नव्या मतदारांच्या समावेशाच्या घोषणेने राजकीय पक्ष अस्वस्थ

हारुण रशीद | श्रीनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर बरोबर तीन वर्षांनी आणखी एका घोषणेमुळे जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय भूकंप आला आहे. जम्मू-काश्मीरच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने घोषणा केली की, या वर्षअखेरीस विधानसभा निवडणूक प्रस्तावित असल्याने मतदार यादीत विशेष सुधारणा करण्यात येतील. जम्मू-काश्मीरच्या इतिहासात प्रथमच तेथे राहत असलेले बाहेरील लोक मतदान करू शकतील. त्यात स्थलांतरित कामगार, मजूर आणि इतर राज्यांतील प्रौढांचा समावेश असेल.

या घोषणेनंतर राज्याच्या राजकीय पक्षांत खळबळ उडाली. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी तातडीने 22 ऑगस्टला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठक सोमवारी 11 वाजता गुपकार भागातील अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी होईल. तीत पुढील व्यूहरचना ठरवली जाईल. बैठकीसाठी भाजपवगळता इतर सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे, अशी माहिती नॅकाँचे प्रवक्ता इम्रान नबी डार यांनी दिली.

भाजपला अनुकूल निर्णय

पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती,​​​​​ म्हणाल्या की, भाजप जम्मू-काश्मीरचे रूपांतर ‘प्रयोगशाळे’त करत आहे. ‘हा निर्णय म्हणजे काश्मीरमधील लोकशाहीच्या स्मशानपेटीवरील अंतिम खिळा ठरेल. स्थानिक लोकांना शक्तिहीन करणे हा हेतू आहे. निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय हा भाजपला अनुकूल समीकरण बनवण्यासाठी आणि निवडणूक निकालांवर परिणाम करण्यासाठी आहे.’

आता स्थिती बदलली

भारतात जे प्रौढ तात्पुरत्या रूपात जेथे राहतात, तेथे मत देऊ शकतात. कलम 370 मुळे स्थायी नागरिकच मतदार होते. आता स्थिती बदलली आहे. - जम्मू-काश्मीर प्रशासन

गेम चेंजर ठरतील 25 लाख मतदार
मतदार यादीत 25 लाख नवीन मतदारांचा समावेश झाला तर ते गेम चेंजर ठरतील. काश्मीरमध्ये तात्पुरत्या स्वरूपात राहणारी कुठलीही व्यक्ती मतदानासाठी पात्र ठरेल.

जम्मू-काश्मिरात किती मतदार आहेत?
2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी जम्मू-काश्मीरमध्ये 78.4 लाख मतदार होते. त्यात लडाखमध्ये 2 लाख मतदार होते, लडाख आता वेगळे आहे.

गेल्या वेळी किती मतदार वाढले?
2019 मध्ये 6.5 लाख नव्या मतदारांचा समावेश झाला होता. आता 25 लाख मतदारांचा समावेश झाला तर केंद्रशासित प्रदेशात मतदारांची संख्या 76.4 लाखांवरून वाढून 1.1 कोटी होईल. जम्मू-काश्मीरमध्ये मतदारांच्या संख्येत एवढी वाढ कधीही झाली नाही.

  • 18 किंवा त्यावरील वयाचे किती लोक आहेत? जनगणनेनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये 18 वर्षे किंवा त्यावरील वयाचे 94 लाख लोक आहेत.

रोहिंग्या मुस्लिमही मतदार होतील?
मतदार यादीत नावे आधार क्रमांकाशी जोडली जातील. त्यामुळे रोहिंग्यांचा समावेश होणे शक्य नाही.

राजकारणावर काय परिणाम होईल?
2014 मध्ये पीडीपीला 10.92 लाख आणि भाजपला 11.07 लाख मते मिळाली होती. त्यांनी जवळपास 22 लाख मतांसह सरकार स्थापन केले. आता 25 लाख मतदारांना व्यूहरचना करून सर्व विधानसभा मतदारसंघांत ठेवले तर ते निर्णायक ठरतील. उदाहरणार्थ गुरेझमध्ये 2014 मध्ये 17,624 मतदार होते. सीमावर्ती भाग असल्याने येथे मोठ्या संख्येने सुरक्षा दलांचे जवान आणि हजारो कामगार आहेत. या सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाली तर ही संख्या निवडणुकीत निर्णायक ठरेल.

बातम्या आणखी आहेत...