आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दाक्षिणात्य राज्ये, खासकरून तामिळनाडूत पोंगल महत्त्वाचा सण असतो. राज्यात एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. गुरुवारी तामिळनाडूत सरसंघचालक मोहन भागवत व काँग्रेस नेते राहुल गांधी दाखल झाले. भागवत यांनी चेन्नईत श्री कादुंबडी चिन्नामन मंदिरात प्रार्थना केली. राहुल गांधी मदुराईतील जल्लीकट्टू कार्यक्रमाला गेले. दोन्ही नेते गोवंश आणि त्याच्याशी संबंधित पूजांत सहभागी झाले. राहुल यांच्यासोबत द्रमुक नेतेही होते. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डाही तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत.
भाजप : २०१६ मध्ये बैलांना प्रदर्शन यादीतून हटवले : २०१६ मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील भाजप सरकारने बैलांना सार्वजनिक प्रदर्शनावरील बंदीच्या यादीतून वगळले. सुप्रीम कोर्टाने आदेशाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने अध्यादेशाद्वारे आयोजनास मंजुरी दिली.
काँग्रेस : जल्लीकट्टू २०११ मध्ये अवैध ठरवले : २०११ मध्ये यूपीए सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने प्रदर्शन म्हणून बैलांच्या वापरावर बंदी घातली. २०१४ मध्ये सुप्रीम कोर्टाने ती योग्य ठरवली. २०१६ मध्ये तामिळनाडू काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जल्लीकट्टूवर बंदी आणण्याचा
मुद्दा समाविष्ट होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.