आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण:रेल्वेंना परवानगी न देणे मजुरांवर अन्याय : शहा; पुरावा द्यावा, अन्यथा शहांनी माफी मागावी : टीएमसी

नवी दिल्ली, कोलकाताएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • प.बंगालमधील मजुरांच्या घरवापसीवरून राजकारण

लॉकडाऊनमध्ये मजुरांच्या घरवापसीवरून राजकीय पक्षांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, परराज्यांतील मजूर त्यांच्या घरी जाऊ इच्छितात, मात्र प. बंगाल सरकार रेल्वेंसाठी परवानगी देत नाही. हा मजुरांवर अन्याय आहे.

शहा यांच्या आरोपावर टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांनी टि्वट केले की, या संकटकाळात आपले कर्तव्य निभावण्यात अपयशी ठरलेले गृहमंत्री आठवडाभर गप्प होते. आता लोकांची दिशाभूल करण्यासाठी ते खोटे बोलताहेत. गंमत म्हणजे ज्या लोकांना त्यांच्या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, त्यांच्याबद्दलच शहा आता बोलताहेत. शहा यांनी आरोप सिद्ध करावे वा माफी मागावी.

१० रेल्वेंसाठी मंजुरी, आज मालदाला जाणार पहिली रेल्वे : 

शहा यांच्या आरोपानंतरही राज्याचे गृह सचिव अलापन बंदोपाध्याय म्हणाले की, परराज्यात अडकलेल्या ६००० जणांना परत आणले आहे आणि इतरांची जाण्याची व्यवस्था होत आहे. राज्याने १० विशेष रेल्वेंना परवानगी दिली आहे त्यावर रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ८ रेल्वेंचा प्रस्ताव मिळाला आहे.

३०२ रेल्वेंपैकी प. बंगालमधून फक्त दोन रेल्वे धावल्या

रेल्वेची आकडेवारी पाहिली तर, ३०२ विशेष रेल्वेंपैकी प. बंगालसाठी फक्त दोन रेल्वे धावल्या, तर बिहारमध्ये ७३ रेल्वे पोहोचल्या आणि १७ मार्गावर आहेत. तसेच आणखी १५ रेल्वे धा‌वण्याच्या तयारीत आहेत. उत्तर प्रदेशात ८८ श्रमिक रेल्वे पोहोचल्या, ३३ मार्गावर आहेत, आणखी २१ धावणार आहेत. झारखंडला १३ रेल्वे पोहोचल्या. तीन मार्गात आहेत, आणखी दोन धावणार आहेत. ओडिशासाठी २० रेल्वे धावल्या. जनगणनेनुसार २००१ ते २०११ मध्ये प. बंगालचे ५.८० लाख, उत्तर प्रदेशचे ३७.३० लाख, बिहारमधून २२.६ लाख व राजस्थानातील ६.६० लोक परराज्यात आहेत.

बातम्या आणखी आहेत...