आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अग्निपथ'वर राजकारण तापले:भाजपा म्हणाली -काँग्रेसचा सरकार अस्थिर करण्याचा कट; ओवैसी म्हणाले -पुन्हा बुलडोझर चालवणार?

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैन्य भरतीशी संबंधित अग्निपथ योजनेच्या मुद्यावरुन आता राजकारण सुरू झाले आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपने काँग्रेसच्या सत्याग्रहावर हल्ला चढवत विरोधी पक्ष मोदी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याच आरोप केला आहे. तर AIMIM खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सरकार या निदर्शकांवरही बुलडोझर चालवणार काय? असा सवाल केला आहे.

भाजपा प्रवक्ता संबित पात्रा म्हणाले की, काँग्रेस स्वतःही काम करत नाही व दुसऱ्यांनाही करू देत नाही. पंतप्रधान अग्निपथावर चालून रिफॉर्म, परफॉर्म व ट्रान्सफॉर्मच्या गोष्ट करतात. पण, विरोधकांना त्यांचे हे राष्ट्रधोरण पचत नाही. काँग्रेसचे नेते देशाला रक्तरंजित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्रियंका म्हणाल्या -केंद्राला योजना मागे घ्यावी लागेल

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सरकारवर तरुणांच्या भविष्यासाठी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या -केंद्राने तरुणांच्या भविष्याचा खेळ मांडला आहे. ही वेळ बोगस राष्ट्रवादवादी व बोगस देशभक्तांची खरी ओळख पटवण्याचा आहे. हा तरुणांचा देश आहे. त्यामुळे संपत्तीची जाळपोळ करू नका. अहिंसक मार्गाने आंदोलन करता. सरकारला अग्निपथ योजना मागे घ्यावीच लागेल.

ओवेसींनी विचारले- सरकार आता किती घरांवर बुलडोझर चालवणार?

AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी एका निवेदनाद्वारे म्हणाले -देशभरात अग्निपथच्या विरोधात निदर्शने होत आहेत. तरुण रेल्वे व रस्त्यांवरील वाहनांची जाळपोळ करत आहेत. प्रेषित मुहम्मद यांच्या अवमानानंतर उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी सरकारने मुस्लिमांची घरे बुलडोझरने जमिनदोस्त केली. त्याच प्रकारे आता या तरुणांच्या घरांवरही बुलडोझर फिरवणार का? कोणाचेही घर पडू नये असे मला वाटते.

पायलट म्हणाले - सरकारचा व्हिस्टा प्रकल्पावर वायफळ खर्च

काँग्रेसच्या सत्याग्रहात सहभागी झालेल्या सचिन पायलट यांनी केंद्रावर तिखट हल्ला चढवला. सरकार अग्निपथ योजनेच्या माध्यमातून तरुणांची फसवणूक करत आहे. हे सरकार व्हिस्टा प्रकल्पा व पंतप्रधानांच्या विमानावरही पैशांची उधळपट्टी करत आहे. सरकारने आपला हट्ट सोडून योजना मागे घ्यावी, असे ते म्हणाले.

काय आहे सैन्य भरतीची अग्निपथ योजना?

लष्कराच्या पायदळ, नौदल व हवाई दल या तिन्ही शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती करण्यासाठी केंद्राने 14 जून रोजी अग्निपथ भरती योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना केवळ 4 वर्षे संरक्षण दलात सेवा द्यावी लागणार आहे. पगार व पेन्शनचे बजेट कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

बातम्या आणखी आहेत...