आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू झाल्याबरोबरच त्यावर राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्ला करत म्हटले की, फेज-3च्या ट्रायल शिवाय लसीला आपत्कालीन परवानगी देण्यात आली. तसेच जर ही लस इतकी विश्वासार्ह असेल तर मग सरकारशी संबंधित लोक त्याचा डोस का घेत नाहीत? असा सवाल काँग्रसने केला आहे.
दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लसीकरण सुरू झाल्यानंतर म्हटले की, ही लस कोरोना विरुद्ध जीवनवाहिनी म्हणून काम करेल. सोबतच अफवांवर विश्वास ठेवू नका आणि वैज्ञानिक-तज्ञांवर विश्वास ठेवा असे आवाहनही त्यांनी लोकांना केले.
जो बायडेन आणि कमला हॅरिस यांनीही लस घेतली : तिवारी
आनंदपुर साहेब (पंजाब) चे काँग्रेस खासदार मनीष तिवारी म्हणाले की, जगातील प्रत्येक देश जेथे लसीकरण सुरू झाले, तेथील नेत्यांनी लस घेतली आहे. प्रेसिडेंट इलेक्ट जो बायडेन आणि व्हाइस प्रेसिडेंट इलेक्ट कमला हॅरिस यांनीही लस घेतली आहे. ब्रिटनमध्ये राणी एलिझाबेथ आणि पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी देखील डोस घेतला आहे. आपल्या लोकांमध्ये लसीप्रती विश्वास जागृत करू शकतील यामुळे त्यांनी लस घेतली. तर मग आपल्या येथे सरकार असे का करत नाही? असा सवालही त्यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.