आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pollution Control Board Sent Notice To Pepsico, Bisleri, Coke , Patanjali Over Plastic Disposal

कोक, पेप्सी, बिसलेरी आणि पंतजलीवर दंड:प्लास्टिक कचऱ्याच्या डिस्पोजलची माहिती न दिल्यामुळे कंपन्यांवर 72 कोटी रुपयांचा दंड

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 9 महीन्यात बिसलेरीचा कचरा 21 हजार 500 टन
  • बिसलेरी, कोक आणि पेप्सिकोने म्हटले- समीक्षा करत आहोत

सेंट्रल पॉल्यूशन कंट्रोल बोर्ड (CPCB) ने कोक, पेप्सी आणि बिसलेरीवर 72 कोटी रुपयांचा दंड लावला आहे. हा दंड प्लास्टिक कचऱ्याच्या डिस्पोजल आणि कलेक्शनची माहिती सरकारी बॉडीला न दिल्यामुळे लावण्यात आला आहे. बिसलेरीवर 10.75 कोटी, पेप्सिको इंडियावर 8.7 कोटी आणि कोका कोला बेवरेजेसवर 50.66 कोटींचा दंड लावण्यात आला आहे.

पतंजलीवर 1 कोटींची पेनल्टी

बाबा रामदेव यांच्या पतंजलीवर 1 कोटी रुपयांची पेनल्टी लागली आहे. याशिवाय दुसऱ्या एका कंपनीवर 85.9 लाख रुपयांची पेनल्टी आहे. CPCB ने म्हटले की, या सर्वांना 15 दिवसात दंडाची रक्कम भरावी लागेल. प्लास्टिक कचऱ्याप्रकरणी एक्सटेंडेड प्रोड्यूसर रिस्पांसिबिलिटी (EPR) एक पॉलिसी मानक आहे, ज्या आधारे प्लास्टिक निर्माण करमाऱ्या कंपन्यांना त्यांच्या प्रोडक्टच्या डिस्पोजलची जबाबदारी घ्यावी लागते.

9 महीन्यात बिसलेरीचा कचरा 21 हजार 500 टन

बिसलेरीच्या प्लास्टिकचा कचरा अंदाजे 21 हजार 500 टन होता. यावर 5 हजार रुपये प्रती टन हिशोबाने दंड लागला आहे. याशिवाय, पेप्सीकडे 11,194 टन आणि कोका कोलाकडे पास 4,417 टन प्लास्टिक कचरा होता. हा कचरा जानेवारी ते सप्टेंबर 2020 दरम्यानचा आहे.

बिसलेरी, कोक आणि पेप्सिकोने म्हटले- समीक्षा करत आहोत
बिसलेरीच्या प्रवक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांची कंपनी PWM आणि सरकारने दिलेल्या पर्यावरण संदर्भातील सर्व नियमांचे पालन करते. उलट प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून त्याचा पुनरवापर करण्याची मोहिम सुद्धा राबवते. एवढेच नव्हे, तर शाळा आणि विविध ठिकाणी या मोहिमेचा प्रचार-प्रसारही केला जातो. तरीही रेगुलेटर्सकडून अधिक माहिती मिळवण्याचा आणि झालेल्या प्रकरणाचा लवकरच निपटारा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

कोकच्या प्रवक्त्यांनी सांगितले, की CPCB कडून नोटीस मिळाली आहे. आम्ही पूर्ण नियमांच्या अंमलबजावणीसह काम करत आहोत. सर्व कामे नियम आणि कायद्याने केली जातात. आम्ही सध्या आलेल्या आदेशाची समीक्षा करत आहोत. पेप्सिकोने सुद्धा आपण EPR च्या अंतर्गत सर्व नियमांचे पालन करत असल्याचा दावा केला. सोबतच, नोटीस मिळाल्याची कबुली दिली.