आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Pollution Updates:Industry Responsible For Air Pollution; 50 Per Cent Share; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहवाल:हवेच्या प्रदूषणासाठी उद्योग जबाबदार; 50 टक्के वाटा; उद्योग जगतानेही केली तक्रार, पण...

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हवेची सुमार गुणवत्ता नुकसानीचे कारण; उद्योग जगताचे मत

हवेच्या प्रदूषणामुळे देशभरातील व्यवसाय जगताला वार्षिक सात लाख काेटी रुपयांचा फटका बसताे, जाे देशाच्या जीडीपीच्या तुलनेत जवळपास ३ टक्के अाहे. उद्याेग जगताने याबद्दल चिंता व्यक्त करतानाच तक्रारही दाखल केली अाहे. पण वास्तविक या एकूण हवेच्या प्रदूषणामध्ये या उद्याेगांकडून निघणाऱ्या धुराचाच ४० ते ५० टक्के वाटा असल्याची सत्य परिस्थिती अाहे. सेंटर फाॅर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटचे निवित कुमार यादव यांच्या मते, उद्याेगांमधून निघणाऱ्या धुराचा एकूण हवेच्या प्रदूषणात २० ते ३० % वाटा अाहे. जर काेळशावर अाधारत ऊर्जा प्रकल्पातील २० टक्के प्रदूषणाचा यात समावेश केला तर हे प्रमाण ४० ते ५० टक्के हाेते. स्वच्छ हवा अहवालामध्ये काेविडमुळे देशातील व्यवसायाचे जितके नुकसान झाले, हवेच्या प्रदूषणामुळे त्याच्या ४३ % नुकसान हाेते.

या वर्षात १.५ अब्ज टन कार्बन उत्सर्जन, इतिहासातील दुसरी सर्वात माेठी वाढ
काेराेना काळात जगभरात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी झाले हाेते. तेल, वायू अाणि काेळशाच्या कमी मागणीमुळे कमी उत्सर्जन हाेऊन पर्यावरणात सुधारण्याची अशा पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली हाेती. परंतु जागतिक अर्थव्यवस्थेत वेगाने हाेत असलेल्या सुधारणेमुळे या वर्षी जगभरातील कार्बन डायअाॅक्साइडचे उत्सर्जन धाेकादायक पातळीवर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत अाहे. अाशिया अाणि विशेष करून चीनमध्ये काेळशाचा माेठ्या प्रमाणावर वापर याचे माेठे कारण असल्याचे सांगितले जात अाहे. ऊर्जा उत्सर्जनाच्या इतिहासात ही दुसरी सर्वात माेठी वाढ असेल असे संस्थेने म्हटले अाहे. काेराेना महामारीतून सावरत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्था अापल्या हवामान बदलासाठी चांगली नाही. सरकारांनी जर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी केले नाही तर २०२२ मध्ये आपल्याला आणखी वाईट परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. हवामान संकटावर जागतिक पातळीवरील ४० प्रमुख नेत्यांच्या गुरुवारी हाेत असलेल्या बैठकीच्या दाेन दिवस अगाेदर हा इशारा देण्यात अाला अाहे.

२०३०पर्यंत अार्थिक नुकसान हाेईल दुप्पट
डलबर्गच्या अहवालानुसार कमी हवेची गुणवत्ता देखील ग्राहकांना अापल्या घरातून बाहेर पडण्याची इच्छा कमी करते आणि त्यामुळे व्यवसायांना थेट ग्राहकांकडून २२ अब्ज डाॅलरचा महसुली ताेटा हाेताे. २०१९ मध्ये हवेच्या प्रदूषणामुळे देशात १७ लाख लाेकांचा अकाली मृत्यू झाला अाहे. अहवालानुसार, २०३० पर्यंत हवेच्या प्रदूषणात वाढ कायम राहिल्यास आर्थिक तोटा दुप्पट होईल.

बातम्या आणखी आहेत...