आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pollution 'very Serious'...schools Upto 5th Class Closed, 50% Government, Private Employees To Work From Home, Diesel Cars, Trucks Banned

दिल्लीत आरोग्य आणीबाणी:प्रदूषण ‘खूप गंभीर’...5 वीपर्यंतच्या शाळा बंद,  50% शासकीय, खासगी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, डिझेल कार, ट्रकवर बंदी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदूषणामुळे दिल्लीचा श्वास गुदमरला आहे. येथील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून एअर क्वालिटी इंडेक्स ( एक्यूआय) ४४५ वर गेला आहे. प्रदूषणाची अत्यंत गंभीर स्थिती पाहून दिल्ली सरकारने इयत्ता ५ वीपर्यंतच्या शाळांना सुटी जाहीर केली आहे. शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सांगण्यात आले आहे. बांधकामे, उत्पादन क्षेत्रातील कामे स्थगित करण्यात आली असून डिझेल कार, ट्रकवर बंदी घालण्यात आली आहे.

हवा बिघडताच राजकीय हल्ले-प्रतिहल्ले

{दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनी पंजाबचे सीएम भगवंत मान यांना पत्र लिहिले.पंजाबमध्ये यंदा २४ अॉक्टो.ते २ नोव्हें.पर्यंत १९% जास्त भाताच्या पेंढ्या जाळण्यात आल्या. { भगवंत मान प्रत्युत्तरात म्हणाले, दिल्लीत लोकनियुक्त सरकारच्या कामात आडकाठी आणता आणि मला चिठ्ठी लिहून राजकारण करता. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर म्हणाले, 3 हजार कोटी खर्च करून राज्यांना 2 लाख मशीन दिल्या तरी ही स्थिती.

...म्हणून श्वास कोंडला एक्यूआय 0-50 पर्यंत सामान्य. 450 पेक्षा अधिक फुप्फुसांसाठी घातक.

बातम्या आणखी आहेत...