आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडूत पुन्हा हिंदीचा अवमान:शिक्षण मंत्री पोनमुडी म्हणाले -आमच्या कोईम्बतूरमध्ये हिंदी बोलणारे पाणीपुरी विकतात

कोईम्बतूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी भाषेच्या मुद्यावरुन उत्तर व दक्षिण भारतीयांत सुरू असलेला वाद अद्याप संपला नाही. आता तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर के. पोनमुडी यांनी हिंदीवर वादग्रस्त विधान केले आहे. "एक भाषा म्हणून इंग्रजीला हिंदीहून जास्त महत्व आहे. हिंदी बोलणारे छोटे-मोठे काम करतात. आमच्या कोईम्बतूरमध्ये हिंदी बोलणारे पाणीपुरी विक्री करतात," असे ते म्हणालेत.

हिंदी का शिकावी?

पोनमुडी यांनी कोईम्बतूरच्या भारथिअर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना हे वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, "हिंदी अनिवार्य नव्हे तर केवळ एक पर्यायी भाषा असावी." यावेळी त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्याचे आश्वासन दिले. परंतु, राज्य सरकारला फक्त दुहेरी भाषा प्रणाली लागू करायची असल्याचा दावाही केला.

त्यांनी तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी यांच्या उपस्थितीत हिंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले -"राज्यात इंग्रजीसारखी आंतरराष्ट्रीय भाषा पूर्वीपासून शिकवली जात असताना हिंदी का शिकावी? तामिळ भाषिक विद्यार्थी कोणतीही भाषा शिकण्यास उत्सुक आहेत. पण, हिंदी त्यांच्यासाठी अनिवार्य नव्हे तर पर्यायी भाषा असली पाहिजे."

पोनमुडी शुक्रवारी कोईम्बतूरच्या भारथिअर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होते.
पोनमुडी शुक्रवारी कोईम्बतूरच्या भारथिअर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होते.

इंग्रजी महान भाषा, हिंदी भाषिक कोणत्याही कामाचे नाही

पोनमुडींनी दावा केला की, "भारतीय शिक्षण व्यवस्थेत तामिळनाडू अग्रस्थानी आहे. इंग्रजी हिंदीहून अधिक महत्वपूर्ण असून, हिंदी बोलणारे केवळ नोकरी करतात." ते एवढ्यावर थांबले नाही. ते पुढे म्हणाले -"ते म्हणाले की हिंदी शिकली तर तुम्हाला नोकरी मिळेल? हे शक्य होईल? कोईम्बतूरमध्ये पाणीपुरी कोण विकते हे तुम्हाला पाहता येईल. या सर्व जुन्या गोष्टी आहेत. इंग्रजी हीच आंतरराष्ट्रीय भाषा आहे."

उल्लेखनीय बाब म्हणजे पोनमुडींनी यावेळी प्रथमच हिंदीचा अवमान केला नाही. त्यांनी यापूर्वीही एकदा हिंदीला क्षुल्लक लेखले होते.

बातम्या आणखी आहेत...