आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री पूजा भट्ट 'भारत जोडो यात्रे'त सहभागी:हैदराबादमध्ये राहुल गांधींसोबत 10.5 किलोमीटर पायी चालली

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'त बॉलिवूड अभिनेत्री आणि चित्रपट दिग्दर्शिका पूजा भट्टने सहभाग घेतला. पूजा भट्टचा राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सामील झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पूजा भट्ट राहुल गांधींसोबत 10.5 किलोमीटर पायी चालली.

पूजा भट्टने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती राहुल गांधींसोबत चालताना-बोलताना दिसत आहे. पूजा पदयात्रेत सामील झाल्याने सोशल मीडियावर अनेकजण तिचे कौतुक करत आहेत.

भारत जोडो यात्रेला 56 दिवस पूर्ण
भारत जोडो यात्रेने आतापर्यंत एकूण 56 दिवस पूर्ण केले आहेत. 7 सप्टेंबर 2022 रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून यात्रेला सुरुवात झाली. तेलंगणापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश केला आहे. सर्व राज्ये केल्यानंतर, हा प्रवास शेवटी जम्मू-काश्मीरमध्ये संपेल.

या यात्रेत पूनम कौर यांचाही सहभाग होता

पूजा भट्टच्या आधी साऊथ अभिनेत्री पूनम कौरही या पदयात्रेत सामील झाली होती. पूनम कौर आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेदरम्यानचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला. त्या फोटोमध्ये राहुल गांधी आणि पूनम कौर यांनी एकमेकांचा हात धरलेला दिसत होता. यावरुन भाजप नेत्यांनी टीका केली होती. तर पूनम यांनीही सडेतोड उत्तर दिले होते.

कन्याकुमारी ते श्रीनगर

काँग्रेसची 'भारत जोडो' यात्रा 7 सप्टेंबर पासून कन्याकुमारीतून सुरू झालीय. ही यात्रा देशातील 12 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधून पुढे जाणार आहे. हा एकूण प्रवास 3,570 किलोमीटर इतका असून पुढच्या 150 दिवसांत ही यात्रा जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर इथे संपेल. या पदयात्रेचे नेतृत्व काँग्रेस नेते राहुल गांधींकडे आहे. त्यांचे या यात्रेतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये राहुल गांधी यांनी भर पावसात जनसभेला संबोधित केले होते.
कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये राहुल गांधी यांनी भर पावसात जनसभेला संबोधित केले होते.

महाराष्ट्रात कधी येणार?

राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा गत 7 सप्टेंबर रोजी सुरू झाली. दक्षिण भारतातील कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जाणारी ही यात्रा महाराष्ट्रात देगलूरमार्गे 7 नोव्हेंबरला दाखल होईल. त्यानंतर नांदेडमार्गे ही यात्रा 6 दिवसांत तब्बल 383 किमीचे अंतर पार करून करून आपल्या पूर्वनियोजित ठिकाणाकडे मार्गस्थ होईल. भारत जोडो यात्रा 5 महिन्यांत सुमारे 3 हजार 570 किमीचे अंतर पार करून काश्मीरमध्ये पोहोचेल. काँग्रेसची ही महत्वकांक्षी यात्रा 12 राज्य व 2 केंद्रशासित प्रदेशांतून जाईल.

बातम्या आणखी आहेत...