आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Pooja Continues In The Ancient Gompa For The Wounded Soldiers Of Galwan For 900 Years, Says Lama With Our Prayers They Will Be Healed Soon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेह रिपोर्ट:गलवानच्या जखमी सैनिकांसाठी 900 वर्षे प्राचिन गोम्पामध्ये सुरू आहे पूजा, लामा म्हणतात - आमच्या प्रार्थनेने ते लवकर होतील बरे

लेह (स्पुतूक गोम्पा)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 हजार फूट उंचीवर असलेल्या या गोम्पामध्ये 100 पेक्षा जास्त लामा राहतात, हे दलाई लामांना आपले गुरू मानतात
  • गोन्बी लामा यांचे म्हणणे आहे की चीनने तिबेटचा ताबा घेतला आणि इतर शेजारच्या देशांशी ते चांगले वागले नाहीत

स्पीतुक गोम्पा हे लेह एअरबेसच्या अगदी समोर आहे. तिथे पोहोचल्यावर ज्यावर पहिल्यांदा नजर गेली ते होते किथे लावलेले एक पोस्टर. त्यावर लिहिले होते - फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी ऑफ एअरबेस इज स्ट्रिक्ली प्रॉहीबीटेड.

10 हजार फूट उंचीवर बांधलेल्या या गोम्पामध्ये 100 हून अधिक लामा राहतात. ते दलाई लामा यांना आपले गुरु मानतात. गोन्बी लामा म्हणतात की, चीनने तिबेटचा ताबा घेतला आणि इतर शेजारील देशांशी ते चांगले वागले नाहीत.

काही दिवसांपूर्वी म्हणजेच 20 जून रोजी, येथील 25 लामा यांनी गलवानमध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा केली आहे. या पूजेमध्ये सध्या रूग्णालयात असलेल्या सैनिकांच्या प्रकृतीसाठी प्रार्थनादेखील करण्यात आली. यासाठी गोम्पा येथे गलवानच्या भारतीय सैनिकांसाठी 2 तास बौद्ध मंत्रोच्चार करण्यात आले.

म्हटले जाते की, लामा तासंतास मंत्रोच्चार करुन जी तंत्र पूजा करतात, यातून त्यांना एवढी ताकद मिळते की, ते अनेक वेळा हवेतही उडू शकतात. 21 तारादेवी लामांना शक्ती देतात. लामा म्हणतात की ते जखमी सैनिकांकडे ही शक्ती पाठवतील आणि त्यांच्या जखमा लवकर बऱ्या होतील.

असेही म्हटले जाते की त्यांच्या तंत्र अभ्यासाच्या बळावर, हे लामा मरणानंतरही 40 दिवस जगू शकतात. इतकेच नाही तर ते पुढील दलाई लामाची निवड दिव्य शक्तीतून मिळालेल्या संकेतांच्या आधारावर करतात. हे एक लहान मुल असते. 

बौद्ध शिक्षक दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतला तेव्हा चीन भडकला होता. फुन्शी लामा म्हणतात की ते आपल्या शक्तीचा वापर भारतीय सैन्याला बळ देण्यासाठी आणि चीन सैन्याला पराभूत करण्यासाठी वापरतात. याच कारणामुळे चीन कधीही भारताला हरवू शकणार नाही.

बातम्या आणखी आहेत...