आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना महामारीमुळे देशातील सर्वच शाळा महाविद्यालयाने विद्यार्थाचे ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरु केले आहे. त्यामुळे देशातील 73% मुले आजघडीला शिक्षणासाठी मोबाईलचा वापर करतात. यातच ही बातमी त्या लाखो पालकांच्या अडचणीत वाढ करत चिंता वाढवणारी आहे. चार दिवसापूर्वी रायसिंह नगर येथील एका 12 वर्षाच्या मुलाने मोबाईलमध्ये अश्लील व्हिडियो पाहत आपल्या 6 वर्षाच्या लहान बहिणीवर बलात्कार केला आहे. संबंधित प्रकरणामध्ये पोलिसांनी शुक्रवारी त्या मुलाला ताब्यात घेतले.
पोलिसांनी सुरूवातीच्या तपासणीत असे स्पष्ट केले आहे की, मुलाला ऑनलाईन शिकवणीदरम्यान अश्लील व्हिडियो पाहण्याची सवय लागली होती. त्यामुळे त्याच्या मनात नकारात्मक भावना तयार होत गेल्या आणि कमी वयामध्ये ही लजास्पद घटना त्याच्या हातून घडली.
आरोपी ६ वर्गातील विद्यार्थी
कोरोना संक्रमनामुळे गेल्या एक वर्षापासून शाळा, महाविद्यालय आदी शैक्षणीक संस्था बंद आहेत. त्यामुळे प्रथम तपासणीत हे समोर आले आहेत की, आरोपी विद्यार्थी गेल्या एक वर्षापासून आपल्या वडिलांच्या मोबाईल ऑनलाईन शिक्षण घेत होता. मोबाईलवर शिक्षण घेत असताना एक दिवस त्याला अश्लील व्हिडियोची नोटीफिकेशन आली आणि नकळतपणे त्याच्याकडून ती दबली गेली. तेव्हांपासून त्याला अश्लील व्हिडियो पाहण्याचे व्यसन लागले.
मुलांवर पालकांनी लक्ष कसे ठेवावे
ॲप्सच्या माध्यमातून - आपल्या मुलांना अश्लील गोष्टींपासून रोखण्यासाठी काही ॲप आहेत जे आपली मदत करू शकतात. पण जोपर्यंत आपल्याला खात्री पटत नाही की, आपला मुलगा काही चुकीचे काम करतो, तोपर्यंत या ॲपचा वापर करु नये. Covenant Eyes, Kids Place – Parental Control, Abeona – Parental Control & Device Monitor हे ॲप्स बाजारमध्ये उपलब्ध असून आपल्या मुलांच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवू शकतात.
कुकीजच्या माध्यमातून - आपल्या मोबाईलमधील क्रोममध्ये गेल्यावर खाली स्क्रोल करत Site Setting या ऑप्शनवर टच करावे. त्यानंतर तेथील कुकीज हे ऑप्शन ऑन करणे. यामुळे सर्च हिस्ट्री डिलीट झाल्यावरदेखील आपल्या कळू शकते की, आपल्या मुलाने कोणत्या साईट सर्च केल्या आहेत. कुकीज वापरकर्त्याव्दारे व्हिजिट केलेल्या साईटस, एक्टिविटी ह्या शेवटपर्यंत सेव्ह राहतात.
भारतात 96% मुले मोबाईलचा वापर करतात
कार्टून चॅनलच्या सर्वेनुसार हे समोर आले आहे की, भारत देशात 96% मुले अशा घरात वास्तवाला आहेत जेथे मोबाईलचा वापर होतो. यातील 73% मुले रोज मोबाईल फोनचा वापर करत असतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.