आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओव्हर द टॉप अर्थात ओटीटीवर चित्रपटांतून अश्लील दृश्येही दाखवली जात आहेत. हा चिंतेचा विषय आहे. यावर नियंत्रण गरजेचे असल्याचे मत सुप्रीम कोर्टाच्या न्या. अशोक भूषण अध्यक्ष असलेल्या न्यायपीठाने गुरुवारी व्यक्त केले.
“तांडव’ या वेब सिरीजप्रकरणी अॅमेझॉन प्राइमच्या अपर्णा पुरोहित यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम काेर्टाने याबाबतचे नियम दाखल करावेत, असे निर्देश दिले. पुढील सुनावणी शुक्रवारी होईल. “तांडव’मधील आक्षेपार्ह दृश्यांबद्दल दाखल गुन्ह्यात पुरोहितला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास कोर्टाने नकार दिला. “अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहुसंख्य लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्यातील मूलभूत अधिकार हिरावून घेऊ शकत नाही,’ अशी टिप्पणी कोर्टाने केली.
कोर्ट रूम लाइव्ह : केंद्राने ओटीटीसाठी तयार केलेले नियम सादर करावेत, कोर्ट ते पाहणार
अपर्णा पुरोहित यांचे वकील मुकुल रोहतगी : हे खूप आश्चर्यकारक प्रकरण आहे. तांडव वेब सिरीजबाबत अॅमेझॉन प्राइम कंपनीवर गुन्हा दाखल न करता तिच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेब सिरीजच्या निर्मात्यावर आणि अभिनेत्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. माझ्या अशील तर फक्त एक कर्मचारी आहेत. गुन्हा तर वेब सिरीज तयार करणाऱ्यांच्या विरोधात दाखल व्हायला हवा. देशात ज्या लोकांनी गुन्हे दाखल केले आहेत, ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे करत आहेत. वेब सिरीज किंमत न चुकवता पाहता येऊ शकत नाही.
न्यायमूर्ती भूषण : (नाराजी दर्शवत) सध्याच्या काळात पारंपरिक चित्रपट पाहणे अप्रचलित झाले आहे. इंटरनेटवर सिनेमा पाहणे आता सर्वसामान्य बाब झाली आहे. या सर्वांचे स्क्रीनिंग व्हावे का, हा प्रश्न आहे. अनेक प्लॅटफॉर्मवर अश्लीलता दाखवली जात आहे. हे खूपच वाईट आहे. त्यावर नियंत्रण आवश्यक आहे, असे आमचे मत आहे.
लुथरा : केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात नवे नियम तयार केले आहेत. त्यात ओटीटी प्लॅटफॉर्मचे कंटेंट नियंत्रित केले जाण्याचा उल्लेख आहे. त्यासाठी एक मंडळ स्थापन करण्यात येईल, असेही म्हटले आहे.
न्यायमूर्ती भूषण : (सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना) ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी तयार करण्यात आलेले नवे नियम कोर्टात रेकॉर्डवर ठेवण्यात यावेत. आम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रेग्युलेशन पाहू.
तज्ज्ञ : युजर्सना पालकांच्या नियंत्रणाबाबत जाणीव करून देणे गरजेचे आहे
भारतातही परदेशाप्रमाणेच नियम करावेत. ओटीटीवर पालकांच्या नियंत्रणाचे सेटिंग आणि त्याच्या सेटिंगच्या फीचरची जबाबदारी प्लॅटफॉर्मवरच सोपवावी. उदाहरणार्थ आपण कोरोनापासून बचावाची रिंगटोन ऐकतो, त्याप्रमाणे ऑडिओ-व्हिडिओ अनिवार्य करून युजर्सना पालकांच्या नियंत्रणाबाबत जागरूक करणे गरजेचे आहे. पालक नियंत्रण यंत्रणेत पर्याय आहे की, कोणत्या वयाच्या व्यक्तीला कंटेंट पाहायचा आहे. पालकांना जेव्हा ओटीटीवर आपल्या पसंतीचा कंटेंट पाहायचा असेल तर ते पाहू शकतील, पण मुलांना तसे करता येऊ नये. - रितेश भाटिया, सायबर एक्स्पर्ट
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.