आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे घर टुमदार अन् सुंदरही:हे आहे दुमडण्याजोगे घर, कुठेही गेल्यावर उघडा-दुमडून ठेवा.. पुन्हा सहज उभे करा...

शिवानी चतुर्वेदी |चेन्नई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2015 मधील चेन्नईतील पूर व काेराेना काळ लक्षात घेऊन ‘पाेर्टेबल-फाेल्डेबल’ घराची निर्मिती

कठीण काळात बदल घडवण्यामध्ये युवक सक्षम असतात हे आयआयटी मद्रासच्या श्रीराम रविचंद्रन व गोबिनाथ पी यांनी सिद्ध केले आहे. २०१५ मधील चेन्नईतील पूर व काेराेना काळ लक्षात घेऊन त्यांनी ‘पाेर्टेबल-फाेल्डेबल’ घराची निर्मिती केली आहे, जे काेठेही उभारता येते व नंतर दुमडून ठेवता येते. स्थलांतरित कामगारांसाठी हे खूप उपयाेगी आहे. मिनी हॉस्पिटल मेडिकाब दुर्गम खेड्यात आरोग्य सुविधांसाठी मेडिकॅब हे छाेटेखानी रुग्णालयही सज्ज आहे. एल अँड टी, टाटा आणि शापूरजी-पालनजी या कंपन्यांनीही या इनाेव्हेशनचे कौतुक करून ऑर्डरही दिल्या आहेत. श्रीराम व गोबिनाथ हे बालमित्र. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात २०१६ मध्ये दाेघांनी या प्रकल्पावर संशोधन सुरू केले आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये फोल्डेबल घरे तयार झाली. दोघांनी ‘मॉड्यूलर हाउसिंग’ नावाने स्टार्टअप सुरू केले. आयआयटी मद्रासही या प्रकल्पात सहभागी आहे. बांधकाम, खाणकाम, रिफायनरी कंपन्यादेखील त्यांच्या कामगारांसाठी या घरांचा उपयाेग करत आहेत. पोर्टेबल घरे ४०० ते ८०० चौ. फुटांची आहेत. कोणत्याही वातावरणात ती सुरक्षित आहेत. शाैचालयाची स्वतंत्र सुविधा आहे. घराची किंमत ६०० रुपये प्रति चौ.फूट आहे. ४०० चौ. फू. घराची किंमत २.४० लाख रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...