आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Positive Story Updates: A Man Rosa Broke And Gave Plasma To Save Lives, That Is The True Prayer; News And Live Upates

माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म:जीव वाचवण्यासाठी रोजा तोडून प्लाझ्मा दिला; म्हणाला, हीच खरी प्रार्थना

उदयपूर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपले जीवन कोणाचे तरी आयुष्य वाचवण्याच्या कामी आले यापेक्षा मोठा धर्म काय असू शकतो

रमजानच्या पवित्र महिन्यात ३२ वर्षीय अकील मन्सुरी याने पुन्हा एकदा एखाद्याची सेवा करणे हीदेखील अल्लाहची सर्वात माेठी प्रार्थना असल्याचे सिद्ध करून दाखवले. अकीलने काेराेनाग्रस्त दाेन महिलांचा जीव वाचवण्यासाठी केवळ राेजा ताेडनेच मान्य केले असे नाही तर त्यासाठी त्याने तिसऱ्यांदा प्लाझ्मादेखील दान केले. वास्तविक शहरातल्या एका रुग्णालयात दाखल झालेल्या निर्मला (३६) अाणि अलका (३०) या महिलांची प्रकृती जास्त बिघडली हाेती. दाेघींना अाॅक्सिजनचा अाधार हाेता.

परिस्थिती अशी झाली की डाॅक्टरांनी दाेघींचा जीव वाचण्यासाठी तातडीने प्लाझ्माची गरज असल्याचे सांगितले. त्यांना रक्तगटही ए पाॅझिटिव्ह हाेता. दाेन्ही महिलांना फक्त ए पाॅझिटिव्ह रक्तगट असलेलाच रक्त देऊ शकत हाेता. अशा वेळी अकील देवदूत बनून अाला. युवा रक्तवाहिनीचे अर्पित काेठारी यांनी प्लाझ्मा देण्यासाठी अकीलला विनंती केली हाेती. अकीलने राेजा ठेवला हाेता. ते प्लाझ्मा देण्यासाठी गेले. पण डाॅक्टरांनी रिकाम्या पाेटी प्लाझ्मा घेऊ शकत नाही असे सांगितले.

त्यासाठी त्यांनी राेजा ताेडून प्लाझ्मा दान केले व दाेन्ही महिलांना नवजीवन दिले. अकील अल्लाहचे अाभार मानताना म्हणाला, अापले जीवन काेणाचे तरी अायुष्य वाचवण्याच्या कामी अाले यापेक्षा माेठा धर्म काय असू शकताे? त्यांनी १७ वेळा रक्तदानही केले अाहे.

बातम्या आणखी आहेत...