आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Positivity Trend In Recovery Cases In The Country, Only 1.8% Of The Population Became Infected, Patients Are Declining In 6 States Including Maharashtra UP

सकारात्मक बातमी:देशात रिकव्हरी प्रकरणात पॉझिटिव्हिटी ट्रेंड, केवळ 1.8% लोकसंख्या झाली संक्रमित, महाराष्ट्र-यूपीसह 6 राज्यांमध्ये कमी होत आहेत रुग्ण

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 7 मेनंतर 27% केस कमी झाल्या

देशात कोरोनाची लाट आता ओसरताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, रिकव्हरीमध्ये स्पष्ट पॉझिटिव्हिटी ट्रेंड दिसत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांमध्येही घट होत आहे. केवळ 8 राज्यच असे आहेत, जेथे रोज 10,000 पेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. 26 राज्यांमध्ये नवीन केस पेक्षा जास्त संख्येत रुग्ण रिकव्हर झाले आहेत. केवळ 8 राज्य असे आहेत, जेथे 1 लाखांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात मंगळवारी पॉझिटिव्हिटी रेट 14.10% नोंदवण्यात आला आहे. कोरोनाचा सर्वात जास्त प्रभाव महाराष्ट्र, यूपी, दिल्ली, बिहार, यूपी, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये केस आणि पॉझिटिव्हिटी रुग्ण सलग कमी होत आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या जॉइंट सेक्रेटरी लव्ह अग्रवाल यांनी मंगळवारी म्हटले की, जगातील दुसऱ्या देशांच्या तुलनेत आपण चांगल्या परिस्थितीत आहोत. देशाची एकूण लोकसंख्येच्या 1.8% भाग आतापर्यंत या आजाराच्या विळख्यात सापडला आहे. आम्ही संक्रमणाचा प्रसार 2% पेक्षा कमी लोकसंख्येत रोखण्यास सक्षण आहोत. त्यांनी सांगितले की, 3 मे रोजी देशात रिकव्हरी रेट 81.7% होता. हा वाढून 85.6% झाला आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये 4,22,436 लोक रिकव्हर झाले आहेत. जे देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी रिकव्हरी आहे. 15 दिवसांपासून सलग केस कमी होत आहेत. केरळमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 99,651 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

7 मेनंतर 27% केस कमी झाल्या
आरोग्य मंत्रालयानुसार देशात दररोज जवळपास 118 लाखांपेक्षा जास्त चाचण्या होत आहेत. सलग टेस्टिंग वाढवली जात आहे. गेल्या काही काळापासून कंटेटमेंट झोनवर फोकस केले जात आहे. याचा परीणामही दिसून येत आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये 2.63 लाखापेक्षा जास्त केस नोंदवण्यात आल्या आहेत. भारतात 7 मे रोजी सर्वात जास्त 4.14 लाख प्रकरणे आले होते. तेव्हापासून नवीन रुग्णांमध्ये 27% घट झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...