आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:सीबीएसईच्या 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास विलंबाची शक्यता

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास उशीर लागण्याची शक्यता आहे. सीबीएसईने शाळांद्वारे विद्यार्थ्यांचे गुण पाठवण्याची अंतिम तारीख वाढवल्याने ही शक्यता व्यक्त होत आहे. सीबीएसईने हा निर्णय महामारीदरम्यान शिक्षकांची सुरक्षितता आणि आरोग्य लक्षात घेऊन घेतला आहे.

याबाबत एक मे रोजी अधिसूचना जारी झाली होती. तीत इयत्ता १० वीसाठी सीबीएसईने सुचवलेल्या फॉर्म्युल्यानुसार मिळालेले गुण (८० पैकी) शाळेतून पाठवण्याची अंतिम तारीख पाच जून होती, तर अंतर्गत मूल्यांकनाचे गुण (२० पैकी) पाठवण्याची तारीख ११ जून होती. आता नव्या अधिसूचनेत शाळांना दोन्ही गुण पाठवण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढवून देण्यात आली होती. त्यामुळे निकाल तयार होण्यास जास्त वेळ लागू शकतो. अधिसूचनेत म्हटले आहे की, उर्वरित उपक्रम निकाल समितीद्वारे निश्चित केले जातील.

बातम्या आणखी आहेत...