आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Post A Photo Of Vivekananda; BJP Will Rule For 30 Years, Tripura Chief Minister Deo Appealed

आगरतळा:विवेकानंदांचा फोटो लावा; भाजप 30 वर्षे राज्य करेल, त्रिपुराचे मुख्यमंत्री देव यांनी केले आवाहन

आगरतळा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील लोकांनी स्वामी विवेकानंद यांचे छायाचित्र व त्यांचा संदेश घरोघर लावल्यास भाजप तीन दशकांपर्यंत सत्तेवर राहील, असा दावा त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लबकुमार देव यांनी केला आहे. भाजप महिला मोर्चाच्या कार्यक्रमात ते शुक्रवारी बोलत होते.

माझ्या गावी मी काही गोष्टी पाहिल्या. त्यांच्या घरात ज्योती बसू, जोसेफ स्टॅलिन, माओ त्से तुंग यांच्या तसबिरी पाहायला मिळाल्या. देवतांची चित्रे लावली जातात तेथे ही चित्रे होती. मग आपण गेल्या अडीच वर्षांत विवेकानंद यांचे फोटो आपल्या घरात लावलेत का? त्रिपुरातील ८० टक्के घरांत विवेकानंद यांचे छायाचित्र लावल्यास सरकार ३० ते ३५ वर्षे सत्तेवर राहील. कमी बोलावे, जास्तीत जास्त लक्ष कामावर केंद्रित केले पाहिजे, असे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते. आपण जास्त बोलत राहिलो तर आपली जास्त ऊर्जा व्यर्थ जाईल, असे देव यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक घरात विवेकानंद यांची छायाचित्रे वितरित केली जावी, असा सल्लाही देव यांनी महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांना दिला. भाजप महिला मोर्चाचा हा कार्यक्रम बुधवारी आगरतळा येथे आयोजित करण्यात आला होता.