आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Postman Not Only Post Letters But Do Home Delivery Of Medicines, Pulses, Vegetables, Fruits, And Even Cash Up To Rs. 5,000

दिव्य मराठी विशेष:पोस्टमन टपालच नव्हे तर औषधी, डाळ, भाजी, फळांचीही होम डिलिव्हरी करेल, 5 हजार रुपयांपर्यंतची रोकडही पोहोचवेल

जालंधर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमध्ये रोज लागणाऱ्या आवश्यक वस्तू घरापर्यंत पोहोचवतोय टपाल विभाग
  • घरबसल्या पैसे घेण्याच्या या योजनेचा ग्रामस्थांना फायदा

अनुभव अवस्थी

पोस्टमन आता केवळ टपालच नाही तर औषधी, भाजीपाला, फळे, पीठ, डाळ व रेशनचीही होम डिलिव्हरी करणार आहे. यासाठी तुम्हाला नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पार्सल बुक करावे लागेल. लॉकडाऊनमध्येही या सुविधा पोस्ट ऑफिसमधून सामान्य नागरिकांना पुरवल्या जात आहेत. तुम्ही देशात कुठेही पार्सल पाठवू शकता. दररोज लागणाऱ्या वस्तू पार्सलद्वारे घरपोच देण्याचे काम केंद्र सरकारने पोस्ट खात्याला सोपवले आहे. लॉकडाऊनमध्ये तुम्हाला नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीला आवश्यक वस्तू पाठवायच्या असल्यास, या सेवेचा लाभ घेऊ शकता. या सुविधांविषयी जालंधर विभागातील पोस्ट ऑफिसचे सीनियर सुपरिंटेंडेंट नरेंद्र कुमार यांनी सांगितले, पंजाबशिवाय मुंबई, बंगळुरू, दिल्ली, कोलकाता, पुण्यासह पाच शहरांसाठीही वस्तूंची बुकिंग सुरू आहे. एवढेच नव्हे तर कर्फ्यूमुळे जे लोक बँकेतून पैसे काढू शकलेले नाहीत, त्यांना घरातच पैसे काढण्याची सुविधा पोस्ट विभागाने उपलब्ध करून दिली आहे. तुमचे खाते आधारशी लिंक असल्यास, तुम्ही पोस्टमनला तुमचे आधार कार्ड दाखवून ५०० ते ५००० रुपये घेऊ शकता. यासाठी कुठल्याही बँकेत खाते असणे गरजेचे आहे.पोस्टमन बायोमेट्रिकने तुम्हाला हवी असलेली रक्कम काढून देईल. हे पैसे तुमच्या खात्यातून कापले जातील. योजनेअंतर्गत जालंधरमध्ये रोज सुमारे २०० जणांना पैसे देण्यात येतात. आतापर्यंत ९०० हून अधिक जणांना घरीच रक्कम उपलब्ध करून दिली आहे. योजनेचा गावातील लोकांना लाभ होत आहे.

बाहेर निघू शकत नसाल तर फोनवर घेऊ शकता सुविधेचा लाभ

लॉकडाऊनमुळे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊ शकत नसाल तर जवळील पोस्ट ऑफिसमध्ये फोन करू शकतात. पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी तुमच्या घरी पोहोचतील. तेथे तुम्हाला सुविधा मिळतील. पैशांची गरज असल्यास पैसेही घेऊ शकतात. तसेच एखादी वस्तू पार्सल करायची असेल किंवा काही माहिती हवी असल्यास तुम्हाला घरीच सर्व माहिती मिळेल. 

बातम्या आणखी आहेत...