आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Postponement Of Posters Outside Corona Victims' Houses, Petition In Supreme Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:कोरोनाबाधितांच्या घरांबाहेर पोस्टर लावण्यास स्थगिती द्या, सुप्रीम कोर्टात याचिका, केंद्राकडूून मागवले उत्तर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रशासनाद्वारे कोरोना रुग्णांच्या घरांवर पोस्टर लावण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली. अनेक राज्ये असा प्रकार करत असून हे सन्मानासह जगण्याच्या अधिकाराचे आणि खासगीपणाच्या अधिकाराचे हनन आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याप्रकरणी कोर्टाने केंद्र सरकारकडून २ आठवड्यांत उत्तर मागवले आहे.

कुश कालरा यांनी अॅड. चिन्मय शर्मा आणि पुनीत तनेजा यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. त्यानुसार, अशा प्रकारचे पोस्टर लावणे अयोग्य आहे. प्लेगच्या साथीच्या काळातही १८ व्या शतकात ही प्रथा पाळण्यात आली होती. पोस्टर लावण्यास स्थगिती देण्याचे निर्देश सर्व राज्यांना जारी केले जावेत. हा प्रकार म्हणजे सन्मानासह जगण्याच्या अधिकाराचे आणि खासगीपणाच्या अधिकाराचे हनन आहे. कोरोनामुळे शारीरिक त्रास होत असलेल्यांना मानसिक त्रासही अशा प्रकारामुळे सहन करावा लागतो.