आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओडिशा:राष्ट्रपती मुर्मूंच्या भाषणादरम्यान वीज गायब; आयोजकांनी मागितली माफी

वृत्तसंस्था|भुवनेश्वर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणादरम्यान वीज गुल झाली. राष्ट्रपतींनी यानंतरही भाषण सुरू ठेवले. वीज गेल्यावर माइक सिस्टिम सुरू होती. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, वीज आमच्यासोबत लपंडाव करत आहे. कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांनीही अंधारातच मुर्मू यांचे भाषण ऐकले. विद्यापीठाचे कुलगुरू संतोषकुमार त्रिपाठी यांनी राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान वीज गायब झाल्याबद्दल माफी मागितली आणि सांगितले की, या दुर्दैवी घटनेबद्दल स्वत:ला दोषी मानतो. आम्ही याची चौकशी करू. टाटा पॉवर, नॉर्थ ओडिशा पॉवर डिस्ट्रिब्युशन लि.चे सीईओ भास्कर सरकार यांनी सांगितले की, वीज तारांत बिघाड झाल्यामुळे ही स्थिती ओढावली.