आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंवर्धनासह वीजनिर्मिती:दोन वर्षे साठवले पावसाचे पाणी,591 मी. उंचीवरील जलधारांतून वीजनिर्मिती, जपानी तंत्रावर उभारला वीज प्रकल्प

प. बंगाल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोकारोपासून ५० किमीवरील प. बंगालच्या पुरुलिया जयपूरमध्ये उभारलेला हा अयोध्या डोंगर वीज प्रकल्प. जपानी तंत्रज्ञानावर उभारलेल्या या प्रकल्पात जलसंवर्धनासह वीजनिर्मिती होते. १९९८ मध्ये धरण उभारणीला सुरुवात झाली. २००५ मध्ये पूर्ण झाले. अयोध्या डोंगरावर जलस्रोत नव्हते. दोन वर्षे पाणी साठवले गेले. २००७ मध्ये खाली उभारलेल्या धरणात पाणी सोडून ९०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू झाली. डोंगरावरून ५९१ मीटर भूमिगत पाइप टाकले गेले. यातून रोज सकाळी पाणी सोडून त्यावर वीज तयार केली जाते. हे पाणी निम्न धरणात जमा होते. रात्री १२ वाजता परत वरच्या धरणात पाठवले जाते. ते सकाळपर्यंत साठवले जाते.

बातम्या आणखी आहेत...