आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Power Sleep Useful For Both Professionals And Students, Meditation Provides Stress Relief

करिअर फंडा:पॉवर स्लीप व्यावसायिक आणि विद्यार्थी दोघांसाठी उपयुक्त, ध्यान केल्याने मिळते तणावमुक्ती

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

"योग तुम्हाला वर्तमानात आणतो, जीवन अनुभवण्याचे एकमेव स्थान" - महर्षी पतंजली

करिअर फंडामध्ये आपले स्वागत आहे!

'ध्यान' या मालिकेतील हा दुसरा लेख आहे.

निद्रानाश, तणाव, अस्वस्थता, रक्तदाब आणि चिंता यांचे बळी आहात का? मागील लेखात आपण 'टी-ब्रेक' ध्यानाबद्दल बोललो होतो आणि आज आपण तणावमुक्तीसाठी 'पॉवर स्लीप' बद्दल बोलू.

व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांनी त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी आजचा लेख वाचला पाहिजे.

तणावाचा थेट परिणाम मेंदूवर होतो

मज्जासंस्थेवर ताणाचे परिणाम 50 वर्षांहून अधिक काळ तपासले गेले आहेत. काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की, तणावाचे मानवी मज्जासंस्थेवर अनेक परिणाम होतात आणि त्यामुळे मेंदूच्या विविध भागांमध्ये संरचनात्मक बदल होऊ शकतात. दीर्घकालीन ताणतणाव मेंदूचे वजन कमी करू शकतो.

ध्यानाचे दोन मुख्य प्रकार

ध्यान एक सराव आहे. जो विविध तंत्रांद्वारे उच्च जागरूकता प्राप्त करण्यास मदत करतो. यामुळे चेतनेमध्ये बदल होऊ शकतो आणि त्याचे अनेक आरोग्य फायदे असल्याचे दर्शविले गेले आहे. तणावमुक्तीसाठी ध्यानाच्या दोन प्रमुख शैली आहेत - केंद्रित-ध्यान आणि मुक्त-निरीक्षण ध्यान.

केंद्रित ध्यानामध्ये वस्तू, विचार, आवाज किंवा दृष्टी यावर लक्ष केंद्रित करून अंतर्गत संवाद कमी करण्याचा प्रयत्न करणे. ओपन-मॉनिटरिंग मेडिटेशन म्हणजे गोंधळलेले विचार, भावना आणि शारीरिक संवेदना, आवेग यांची जाणीव करून देणे आणि संकोच न करता त्यांना स्वीकारणे.

"पॉवर स्लीप" हे एक प्रकारचे ध्यान आहे

आता मी तुम्हाला "पॉवर स्लीप" कसे करायचे ते सांगेन.

A. स्वच्छ, आरामदायक कपडे घाला.

B. कोणत्याही आरामदायी आसनात बसा (किंवा झोपा).

C. डोळे बंद करा.

D. लक्षात ठेवा की तुम्हाला झोपण्याची गरज नाही.

E. श्वास घेण्यावर आणि सोडण्यावर ध्यान केंद्रित करा. 'सो हम'चा आवाज तुम्हाला ऐकू येईल.

F. डोळे मिटून आरामदायी स्थितीत बसलेले किंवा पडून राहण्याची कल्पना करा.

G. ध्यान करत तुमच्या अंगठ्याच्या टोकावर जा. आता कल्पना करा की तिथेल 'मांस', 'रक्त', 'हाडे' विश्रांती घेत आहेत.

H. आता पायाच्या बोटाबाबतही तोच विचार करा.

I. असेच करत शरीराच्या टाच, पाय, गुडघे, मांड्या, कंबर, पोट, फुफ्फुसे, घसा सर्व काही त्याच प्रकारे मनाच्या डोळ्यांनी 'बंद' करून हळुहळु नाकाच्या दिशेने या.

J. शेवटी 'पाइनियल ग्रंथी' च्या स्थितीवर लक्ष केंद्रित करा.

K. जोपर्यंत तुम्हाला आरामदायक वाटत असेल तोपर्यंत या स्थितीत रहा.

L. नंतर शरीराचे अवयव ज्या क्रमाने 'शट-डाउन' करत तुम्ही वर आला आहात. त्याप्रकारे हळूहळू 'रीस्टार्ट' करा.

M. या प्रक्रियेसाठी 20-30 मिनिटे आरामात द्या.

N. 'पॉवर स्लीप' घेतल्यानंतर लगेच उभे राहू नका.. डोळे उघडे ठेवून थोडावेळ बसा.. नंतर दोन्ही हातांचे तळवे एकत्र घासून हलके गरम करा आणि डोळ्यांना लावा, हे दोन ते तीन वेळा करा.

O. चांगल्या परिणामांसाठी, चॉकलेट आणि थंड/सामान्य पाणी यांसारखे काही आरोग्यदायी गोड सेवन केले जाऊ शकते.

P. तणावमुक्तीसाठी रामबाण उपाय आहे. तोही अगदी मोफत!

पॉवर स्लीपशी संबंधित चार मोठ्या गोष्टी

1) तुम्ही कधीही 'पॉवर स्लीप' घेऊ शकता.

2) हे नियमित करा, यामुळे झटपट ताजेतवाने जाणवते, सात-आठ आठवड्यांच्या नियमित सरावानंतरच त्याची झलक तुमच्या उत्तम आरोग्यातही दिसू लागेल.

3) 'पॉवर स्लीप' तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत करू शकते. विश्रांती तंत्र म्हणून, ते मन आणि शरीराला शांत करते आणि आंतरिक शांततेला प्रोत्साहन देते.

4) 'पॉवर स्लीप'चा दररोज सराव केल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रित होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. अभ्यासात असे आढळून आले आहे की, ध्यान केल्याने तुमच्या मेंदूच्या निर्णयक्षम केंद्रांचे कार्य सुधारून चांगले निर्णय घेण्यास मदत होते.

आशा आहे की माझी सुचवलेली 'पॉवर स्लीप' व्यावसायिकांना त्यांचे काम करण्यास आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळवण्यास मदत करेल.

ध्यानाचा नियमित सराव आत्म-जागरूकता वाढवून राग, भीती इत्यादी नकारात्मक भावनांचे व्यवस्थापन करण्यास मदत करते. याविषयी आपण पुढील लेखांमध्ये तपशीलवार चर्चा करू.

आजचा 'करिअर फंडा' हा आहे की, कामाच्या दडपणाखाली असलेले व्यावसायिक आणि विद्यार्थी दोघेही त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी 'पॉवर स्लीप' सारखे प्रयत्न करु शकतात.

करुन दाखवा!

बातम्या आणखी आहेत...