आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Power Struggle In Maharashtra, Hearing On November 29, Submit Written Statement; Supreme Court Order To Thackeray, Shinde Group

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष:29 नोव्हेंबरला सुनावणी, लेखी म्हणणे सादर करा; ठाकरे, शिंदे  गटाला सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान घटनापीठाने ठाकरे व शिंदे गटाला तोंडी युक्तिवाद न करता लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश दिले. यावर दोन्ही गटांनी युक्तिवाद व संबंधित कागदपत्रे सादर करण्यास ४ आठवड्यांची मुदत द्यावी, अशी विनंती घटनापीठाला केली. घटनापीठाने ही विनंती मान्य केली. त्यामुळे आता याप्रकरणी २९ नोव्हेंबरला सुनावणी होईल, असे घटनापीठाने स्पष्ट केले.

१६ बंडखोर आमदारांचे निलंबन, शिंदे सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्ष तसेच राज्यपालांचे अधिकार अशा विविध मुद्द्यांवर ठाकरे गट तसेच शिंदे गटानेही सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्या आहेत. मंगळवारच्या सुनावणीत बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद केले जाण्याची शक्यता होती. मात्र, सुनावणी सुरू झाल्यानंतर घटनापीठाने तोंडी युक्तिवाद ऐकण्यास नकार दिला.

असीम सरोदेंची याचिका अ‌ॅड. असीम सरोदे यांचीही याचिका घटनापीठासमोर मांडण्यात आली. सर्वजण ठाकरे गट आणि शिंदे गटालाच त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगत आहे. मात्र, जनतेला या बंडखोरीबद्दल काय वाटते, हेदेखील जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे सरोदेंनी याचिकेत म्हटले आहे.

लेखी युक्तिवादाचा अभ्यास करणे सोपे ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी सांगितले की, लेखी युक्तिवाद दिल्यास त्याचे अवलोकन व अभ्यास करणे सोयीचे जाईल. तोंडी युक्तिवाद लांबत जाऊ शकतात, असे मत घटनापीठाने व्यक्त केले. त्यानंतर लेखी युक्तिवादाबाबत दोन्ही गटांची मते विचारली. त्यावर दोन्ही गटांनी सहमती दर्शवली. कारण हा संविधानात्मक पेच आहे. यात विविध मुद्दे, अंगे आहेत. त्यांचा अभ्यास करून निरीक्षण नोंदवणे महत्त्वाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...