आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेशातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाला अशी भेट दिली की तिचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले. भेट म्हणून तिला सवत मिळाली. तिच्या पतीने दुसरे लग्न केले. पहिल्या पत्नीने बुधवारी या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. ती म्हणाली -पतीने प्रेमाच्या नावाने आपल्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नाला नकार दिल्यानंतर मी बलात्काराची तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याने माझ्याशी लग्न केले.
प्रकरण शिवपुरीच्या सिरसौद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पीडित महिलेच्या मते, तिचे 10 जून 2021 रोजी बीपी नामक तरुणाशी लग्न झाले होते. 10 जून 2022 रोजी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. त्याच दिवशी पतीने दुसरे लग्न केले.
विरोध केल्यानंतर मारहाण करुन घरातून काढले
पीडितेच्या तक्रारीनुसार, तिच्या लग्नाला 1 वर्ष झाले. मधल्या काळात तिला चिकनपॉक्स अर्थात कांजिण्या झाल्या. तिच्या आजारपणाचा फायदा घेत पतीच्या नातेवाईकांनी त्याचे दुसऱ्या एका मुलीशी लग्न लावून दिले. याचा तिने विरोध केला असता तिला मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर तिला घराबाहेरही काढले.
नाते संपले, तरीही विश्वासात घेऊन शारिरीक संबंध
पीडितेने सांगितले की, 2018 मध्ये पहिल्यांदा त्यांच्या लग्नाची चर्चा झाली. गोष्ट पुढे सरकली होती. प्रकरण हुंड्यावर अडकले. मुलाच्या वडिलांनी एवढा हुंडा मागितला की माझ्या घरच्यांनी लग्नाला नकार दिला. लग्न तुटल्यानंतर काही दिवसांनी मला बीपीचा फोन आला. त्याने मला लग्नाचे आमिष दाखवले. वारंवार सांगितल्यानंतर मी त्याच्या जाळ्यात अडकले.
बीपीने मला शिक्षणासाठी शिवपुरीत खोली घेऊन राहण्यास सांगितले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न करण्याची ग्वाहीही दिली. त्याच्या आश्वासनाला भुलून मी शिवपुरीत राहू लागले. येथे बीपीचे येणे-जाणे सुरू होते. यावेळी बीपीने लग्नाचे आमिष दाखवून माझ्यासोबत अनेकदा शारिरीक संबंध प्रस्थापित केले.
बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर लग्न
महिलेचे म्हणणे आहे की, 2019 मध्ये बीपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर तिने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अखेर कुटुंबाच्या संमतीने बीपीने 10 जून 2021 रोजी तिच्याशी लग्न केले. तेव्हापासून ते दोघेही एकत्र राहत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.