आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर सध्या धर्मनगरी वृंदावनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना सप नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या -भारतात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण आमच्या धर्मावर कुणी हल्ला केला, तर त्याला असे प्रत्युत्तर दिले जाईल की पळता भुई थोडी होईल.
प्रज्ञा सिंह यांनी यावेळी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावरील आरोप जोरकसपणे फेटाळून लावले. त्या म्हणाल्या की, धीरेंद्र कृष्ण शास्त्रींमधील शक्ती प्रत्येकाला मिळत नाहीत. याला आधूनिक भाषेत माइंड रीडिंग म्हणा किंवा आणखी काही. अनेक विधर्मी सनातन धर्मावर हल्ले करतात. त्याचा सनातन धर्मावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांच्या माध्यमातून हिंदू व हिंदुत्व काढ वाढत आहे व त्यांची पूजा का केली जात आहे? हेच डाव्या विचारसरणीच्या लोकांचे दुखणे आहे.
'धीरेंद्र कृष्ण हनुमानजींच्या शक्तीवर ठाम'
साध्वी प्रज्ञा पुढे बोलताना म्हणाल्या की, 'धीरेंद्र कृष्ण हनुमानजींच्या शक्तीवर ठाम आहेत. हनुमानजींच्या आध्यात्मिक व शाश्वत शक्तींना जगातील कुणीही फेटाळू शकत नाही. भारत विश्वगुरू होता. भविष्यातही भारत मातेला परमवैभवावर पोहोचवून भारत विश्वगुरू पोहोचेल. याच अनुषंगाने धीरेंद्र कृष्ण काम करत आहेत. ते अशाच प्रकारे देशसेवा करतील अशी इच्छा आहे.'
रामचरितमानसच्या प्रती दहन केल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, 'विधर्मींनी काहीही केले तरी त्यांना सनातन धर्म व राष्ट्र धर्मावर कधीही विजय मिळणार नाही.'
इंद्रदेवानंद महाराजांशी आध्यात्मावर चर्चा
भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महामंडलेश्वर स्वामी इंद्रदेव सरस्वती महाराज यांच्या सानिध्यात सुरू असणाऱ्या श्री राधा किशोरी सेवा धाम आश्रमाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. त्यांनी भागवत प्रवक्ते इंद्रदेवानंद महाराजांशीही आध्यात्मावर चर्चा केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.