आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Pranab Mukherjee Fit In Every Role From Congress Troubleshooter To 'Citizen Mukherjee'; From Indira Gandhi To Sonia Gandhi, Another Name Of Faith Was Former President Pranab Mukherjee

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असे होते प्रणवदा...:काँग्रेसचे संकटमोचक ते ‘सिटिझन मुखर्जीं’, प्रत्येक भूमिकेत फिट; इंदिरा गांधी ते सोनिया गांधी, विश्वासाचे दुसरे नाव होते माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रणव मुखर्जींना लिव्हिंग कॉम्प्युटर आणि टेक्स बुक मॅन मानले जायचे

सिटिझन मुखर्जी...असेच होते प्रणवदांचे ट्विटर हँडल. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत ते मॅन फॉर ऑल सीझन्स आणि ट्रबलशूटर अशा नावांनी ओळखले गेले. मात्र, ते कधीही जनाधार असलेले नेते होऊ शकले नाहीत हे ते स्वत:ही मान्य करतात. काँग्रेसमध्ये त्यांना अडचणी दूर करण्याचा उपाय मानले जायचे. २०१२ मध्ये राष्ट्रपतिपद सांभाळल्यानंतर त्यांची प्रतिमा राजकीय नेता आणि पक्षाच्या तुलनेत अधिक उंचावली. ते खऱ्या अर्थाने देशाचे प्रथम नागरिक बनले. राजकीय नेता म्हणून त्यांचा काँग्रेसच नाही तर इतर पक्षांनीही आदर केला. तेथेच राष्ट्रपती म्हणून ते जनतेचे प्रतिनिधी बनले. त्यांना लिव्हिंग कॉम्प्युटर आणि टेक्स बुक मॅन मानले जायचे.

असे होते प्रणवदा...

जनाधार नाही हे खुलेपणाने स्वीकारले

प्रणवदांनी आपले आत्मचरित्र ‘द टर्ब्युलंट इअर्स’मध्ये ६० च्या दशकात अजय मुखर्जी आणि सद्य:स्थितीत ममता बॅनर्जींसारखा किंवा खुद्द इंदिरा गांधींसारखा जनाधार मला मिळाला नाही हे मान्य केले आहे. त्यांनी लिहिले, मी चुकाही केल्यात. मी जनाधार नसलेला नेता होतो हे मी समजायला हवे होते. १९८६ आणि १९८७ मध्ये राजीव गांधींविरोधात सर्वकाही सुरू असताना तेव्हा मी काँग्रेस व सरकारची मदत करू शकलो असतो.

वेगळा पक्ष काढला, पुन्हा काँग्रेसमध्ये

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यानंतर तेव्हा प्रणवदांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. मात्र, इंदिरा गांधींनंतर त्यांना स्वत:ला सत्ताधीश व्हायचे होते असे आरोप त्यांच्यावर झाले. मात्र, आपल्या आत्मचरित्रात त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर प्रणवदांना दूर केले गेले होते. तसेच नंतर सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबितही करण्यात आले होते. यामुळे प्रणव मुखर्जींनी १९८६ मध्ये ‘राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस’ हा स्वत:चा पक्ष काढला. मात्र, केवळ ३ वर्षांमध्येच हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला.

संघाच्या संमेलनात पोहोचल्याने धक्का

राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही जून २०१८ मध्ये प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात वक्ता म्हणून सहभागी झाले. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या काँग्रेसच्या सहकाऱ्यांसह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तसेच देशातील राजकारणातही नवा वाद निर्माण झाला. त्यांच्या या निर्णयावर त्यांचे जुने सहकारी अहमद पटेल तसेच त्यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जींनीही प्रश्न उपस्थित केले. प्रणवदा जमिनीशी जोडलेले नेते होते. त्यांचे असे वर्तन अनेकदा दिसून आले.

त्यांच्या साधारण शरीरयष्टीपेक्षा मजबूत होते त्यांचे आत्मबळ : लेफ्टनंट जनरल बीएनबीएम प्रसाद

ते संरक्षणमंत्री असताना त्यांना त्यांच्या तालकटोरा येथील घरी भेटण्याची संधी मला मिळाली होती. मला त्यांची आरोग्य तपासणी करायची होती. कारण त्यांना अंटार्क्टिकाला जायचे होते. त्यांनी लुटियन्सच्या आलिशान बंगल्याऐवजी हे छोटेसे घर आपल्यासाठी निवडल्याचे मला नंतर कळाले होते. या घराचा क्रमांक १३ होता. मात्र, प्रणवदांनी हा नंतर बदलला होता.

त्यांनी याच घरात असताना मोठी पदे भूषवली तसेच देशाचे १३ वे राष्ट्रपतीही झाले. सकाळचे ८ वाजले होते. मी त्यांच्या लिव्हिंग रूममध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी मोकळेपणाने माझे स्वागत केले. सुरुवातीच्या चर्चेनंतर मी त्यांची मेडिकल हिस्ट्री तपासली. ते अत्यंत शांत, विनम्र आणि विद्वानांप्रमाणे होते. मी त्यांची दिनचर्याही पाहिली. ऊर्जेचा स्रोत असलेले प्रणवदा दिवसात १८ तास काम करायचे. एवढा वेळ काम करण्यासाठी त्यांच्यात एवढी ऊर्जा येते कशी, याबाबत मला आश्चर्य वाटायचे. प्रणवदा तेव्हा सरकारमध्ये मोठ्या पदावर होते. तसेच ते सरकार आणि आपल्या पक्षासाठी संकटमोचकही बनले होते. तेव्हा मला त्यांच्या भक्कम आत्मबळाची ओळख झाली. यामुळे त्यांनी अनेक मोठ्या पदांना गवसणी घातली. यामागे त्यांच्या संयमित आणि शिस्तप्रिय जीवनशैलीचा मोठा हात आहे. साधारण दिनचर्या आणि उच्च विचारसरणीमुळे ते साधारण शरीरयष्टी असूनही मोठ्या आव्हानांचा सामना करण्यास सक्षम होते. या सर्व गोष्टींमुळे त्यांचे आरोग्य चांगले होते. या कारणानेच मी त्यांना दुर्मिळ आणि बर्फाच्छादित अंटार्क्टिकामध्ये तयार झालेल्या भारतीय तळावर जाण्याची परवानगी दिली होती. ते राष्ट्रपती झाल्यानंतर मी त्यांना अनेकदा भेटलो. २०१६ मध्ये त्यांनी माझ्या सेवेबद्दल माझा सत्कारही केला होता. आजही त्यांच्याबद्दलचे माझे मत अजिबात बदललेले नाही. प्रत्येक भेटीनंतर त्यांच्याबद्दल असलेला आदर वाढत गेला. अनेक मोठी पदे भूषवल्यानंतरही ते अजिबात भ्रष्ट नव्हते.