आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Pranab Mukherjee Last Rites News Update | Former President Pranab Mukherjee Dies At Army Hospital In Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवणीत उरले प्रणव दा...:माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अनंतात विलीन; दिल्लीतील लोधी रोडवरील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी निधन झाले, 10 ऑगस्टला झालेल्या ब्रेन सर्जरीनंतर प्रकृती खालावली

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (84) यांच्यावर दिल्लीतील लोधी रोडवरील स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. प्रणव यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी अंत्य संस्काराच्या सर्व क्रिया पार पाडल्या. कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी पीपीई किट घातले होते.

अंत्यसंस्कारापूर्वी त्यांच्या 10 राजाजी मार्गावीरल घरात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि काँग्रेस नेते राहुल गांधींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

21 दिवसांपूर्वी कोरोनाचे निदान, ब्रेन सर्जरीनंतर कोमात होते

माजी राष्ट्रपती व अनेक दशके काँग्रेसचे संकटमोचक भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी निधन झाले. देशात 7 दिवसांच्या राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली आहे. 84 वर्षांच्या प्रणवदांनी 10 ऑगस्टला कोरोना संसर्गाची माहिती दिली होती. त्याच दिवशी त्यांच्यावर मेंदूतील गुठळ्या काढण्याची शस्त्रक्रिया झाली. फुप्फुसांत संसर्गानंतर ते व्हेंटिलेटरवर होते. तेव्हापासून ते कोमात होते. त्यांच्यावर आज दिल्लीमध्ये अंत्यसंस्कार होऊ शकतात.

क्लर्क म्हणून काम केले, कॉलेजमध्येही शिकवले

प्रणव यांचा जन्म ब्रिटिश काळातील बंगाल प्रेसिडेंसी (आता पश्चिम बंगाल) च्या मिराती गावात 11 डिसेंबर 1935 ला झाला होता. त्यांनी कलकत्ता विश्वविद्यालयातून पॉलिटिकल सायंस आणि हिस्ट्रीमध्ये एमए केले. त्यांनी डेप्यूटी अकाउंट जनरल (पोस्ट अँड टेलीग्राफ) मध्ये क्लर्क म्हणून काम केले होते. 1963 मध्ये त्यांनी कोलकाताच्या विद्यानगर कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायंसचे लेक्चरर होते.

1969 मध्ये सुरू झाला राजकीय प्रवास

प्रणव यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात 1969 मध्ये झाली. त्यांनी मिदनापूर पोटनिवडणुकीत वीके कृष्ण मेनन यांचे कॅम्पेन सांभाळले होते. तेव्हा पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी त्यांचे काम पाहून पक्षात घेतले. 1969 मध्येच प्रणब राज्यसभेवर निवडूण गेले. त्यानंतर 1975, 1981, 1993 आणि 1999 मध्येही राज्यसभेवर निवडूण गेले.

नशीब : तीन वेळा पंतप्रधानपदाने दिली हुलकावणी

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पुढील पंतप्रधान म्हणून प्रणवदांचे नाव चर्चेत होते. मात्र पक्षाने राजीव गांधींची निवड केली. डिसेंबर 1984 मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर प्रणवदांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले नाही. 1986 मध्ये त्यांनी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस स्थापली. 3 वर्षांनी पुन्हा काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले.

राजीव गांधींच्या हत्येनंतरच्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेत परतली. या वेळी प्रणवदांच्या तुलनेत कुणीही तगडा दावेदार नसल्याचे मानले जात होते. मात्र या वेळी पी.व्ही. नरसिंह राव यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली. प्रणवदा आधी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि नंतर 1995 मध्ये परराष्ट्रमंत्री झाले.

2004 मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 145 आणि भाजपला 138 जागा मिळाल्या. सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस प्रादेशिक पक्षांवर अवलंबून होती. सोनिया गांधींना पंतप्रधानपदाची संधी होती. मात्र त्यांनी नकार दिला. पुन्हा प्रणव मुखर्जी यांचे नाव चर्चेत होते. मात्र या वेळी सोनियांनी मनमोहनसिंग यांची निवड केली.

खंत... हिंदीमुळे पीएम होऊ शकले नाहीत

प्रणवदा 5 दशके राजकारणात सक्रिय होते. अनेक दशके ते काँग्रेसचेे संकटमोचक राहिले. पीएमपदाच्या प्रश्नावर ते पत्रकारांना म्हणत, ‘माझी हिंदी चांगली नाही ना.. म्हणून मी पंतप्रधान बनू शकलो नाही.’