आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रणवदांना अखेरचा निरोप:पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथसिंह आणि उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचे घेतले अंत्यदर्शन

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी राष्ट्रपती व अनेक दशके काँग्रेसचे संकटमोचक भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी निधन झाले. आज दुपारी 2 वाजता नवी दिल्ली येथील लोधी रोड स्थित स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. प्रणव मुखर्जींचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी त्यांच्या 10 राजाजी मार्ग स्थित निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस बिपीन रावत आणि तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली. कोरोना प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार केले जातील.

लोकसभा अध्य्क्ष ओम बिर्ला यांनी घेतले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अंत्यदर्शन.
लोकसभा अध्य्क्ष ओम बिर्ला यांनी घेतले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अंत्यदर्शन.
चीफ ऑफ आर्मी स्टाफ बिपिन रावत आणि तीनही सेना तीनों सेना प्रमुखांनी प्रणवदांना श्रद्धांजली वाहिली.
चीफ ऑफ आर्मी स्टाफ बिपिन रावत आणि तीनही सेना तीनों सेना प्रमुखांनी प्रणवदांना श्रद्धांजली वाहिली.

7 दिवसांच्या राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा
देशात ७ दिवसांच्या राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली आहे. ८४ वर्षांच्या प्रणवदांनी १० ऑगस्टला कोरोना संसर्गाची माहिती दिली होती. त्याच दिवशी त्यांच्यावर मेंदूतील गुठळ्या काढण्याची शस्त्रक्रिया झाली. फुप्फुसांत संसर्गानंतर ते व्हेंटिलेटरवर होते. तेव्हापासून ते कोमात होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser