आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नवी दिल्ली:प्रणव मुखर्जींची प्रकृती आणखी ढासळली, फुप्फुसांत संसर्गाचे लक्षण; मेंदूची शस्त्रक्रिया झाल्यापासून ते व्हेंटिलेटरवर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रणव मुखर्जी यांच्यावर 10 ऑगस्टला मेंदूची शस्त्रक्रिया, तेव्हापासूनच ते व्हेंटिलेटवर

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत गेल्या काही दिवसांत सुधारणा दिसली होती. पण, बुधवारी त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली असून गंभीर झाली आहे. त्यांच्या फुप्फुसांत संसर्गाचे लक्षण दिसल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

प्रणव मुखर्जी यांच्यावर १० ऑगस्टला मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या मेंदूतील गुठळी काढण्यात आली. त्याचबरोबर त्यांना कोरोना झाल्याचेही आढळले होते. तेव्हापासूनच त्यांना व्हेंटिलेटवर ठेवलेले आहे. त्याआधी त्यांचे चिरंजीव अभिजित यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘आपणा सर्वांच्या शुभेच्छा आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे वडिलांची प्रकृती स्थिर आहे.”