आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Prashant Bhushan Case : What's The Point Of Apologizing For Hurting Someone? Gandhiji Used To Do The Same: Supreme Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यायाधीशांचे अवमान प्रकरण:कुणाला दुखावल्यास माफी मागायला काय हरकत? गांधीजीही असे करायचे : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अवमान प्रकरणात प्रशांत भूषण यांच्या शिक्षेवरील निकाल राखीव

दोन वादग्रस्त ट्वीट्समुळे कोर्टाच्या अवमाननेचे दोषी वकील प्रशांत भूषण यांच्या शिक्षेवर सुप्रीम कोर्टाने मंगळवारी निकाल राखून ठेवला. त्याआधी न्या. अरुण मिश्रा यांनी भूषण यांना माफी मागायला सांगितले. ते म्हणाले, ‘तुम्ही जर कुणाला दुखावले असेल तर माफी मागायला काय हरकत आहे? महात्मा गांधीजीही असेच करायचे. माफी मागणारा गांधीजींच्या आदेशाचे पालन करतो.’

सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल आणि ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी भूषण यांना शिक्षा न देता फक्त तंबी देऊन सोडण्याचे आवाहन केले.

कोर्ट लाइव्ह : भूषण यांना शहीद बनवू नका : धवन

न्या. मिश्रा : कोर्टाने विनाशर्त माफी मागण्यास सांगितले होते. मात्र भूषण यांनी नकार दिला.

अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल : या प्रकरणामध्ये शिक्षेऐवजी प्रशांत भूषण यांना तंबी देऊन सोडता येईल. अनेक मान्यवरांचीही हीच इच्छा आहे.

न्या. मिश्रा : आम्हाला शिक्षा द्यायचीच असेल तर ती काय द्यावी?

राजीव धवन (भूषण यांचे वकील) : काही महिने वकिली करण्यास मनाई करू शकता. त्यांना शिक्षा देऊन शहीद बनवू नका. बाबरी खटल्यात कल्याण सिंह यांना अवमानना प्रकरणात एका दिवसाची शिक्षा झाली होती. तेव्हा एका गटाने त्यांच्याकडे शहीद म्हणून पाहायला सुरुवात केली होती. परिपक्वता दाखवून वाद संपवावा.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser