आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Prashant Bhushan Refuses To Apologize, Says Doing So Would Be Contempt Of Conscience And Supreme Court

सुप्रीम कोर्ट अवमान प्रकरण:माफी मागण्यास प्रशांत भूषण यांचा नकार, म्हणाले - असे केल्यास अंतरात्मा आणि सुप्रीम कोर्टाचा अवमान ठरेल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माफी दबावात किंवा एखाद्याच्या सांगण्यावरून नव्हे, प्रामाणिकपणे मागायला हवी : अॅड. प्रशांत भूषण

न्यायालयाच्या अवमाननेचे दोषी अॅड. प्रशांत भूषण यांनी त्यांच्या वादग्रस्त ट्वीटसाठी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्यास पुन्हा नकार दिला. ते म्हणाले, मी वक्तव्य मागे घेतले किंवा माफी मागितली तर माझ्या दृष्टीने ते मी ज्यांचा सर्वाधिक सन्मान करतो तो अंतरात्मा आणि सुप्रीम कोर्टाचा अवमान असेल.

दोन पानी शपथपत्रात भूषण म्हणाले, आपण हे ट्वीट चांगल्या हेतूने आणि संस्थेच्या भल्यासाठी केले होते. यामुळे माफी मागणे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने येत्या २० ऑगस्टला शिक्षेवरील युक्तिवादानंतर भूषण यांना विनाअट माफी मागण्याबाबत विचार करण्यासाठी दोन दिवस दिले होते. यावर त्यांनी सोमवारी उत्तर दिले.

माफी दबावात किंवा एखाद्याच्या सांगण्यावरून नव्हे, प्रामाणिकपणे मागायला हवी : अॅड. प्रशांत भूषण

कोर्टाचे आदेश वाचून वाईट वाटले. कोर्टाने कोर्टरूममध्ये केलेल्या वक्तव्यावर फेरविचार करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती. मात्र, आदेशात म्हटले की, विनाअट माफीनामा सादर करण्यासाठी दाेन दिवस दिले. सर्वोच्च न्यायालयाबाबत माझ्या मनात सर्वोच्च सन्मान आहे. मूलभूत अधिकार, स्वायत्त संस्था आणि संवैधानिक लोकशाहीच्या रक्षणासाठी कोर्ट अखेरची आशा आहे. ट्वीट चांगल्या हेतूने आणि न्यायिक संस्थेच्या भल्यासाठी केले होते. यात पूर्ण तपशिलासह सत्यतेचा युक्तिवाद होता.