आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prashant Kishor And Sharad Pawar Meeting In Delhi Residence, 15 Opposition Party Meeting On 22nd June 2021, News And Updates

मिशन लोकसभा 2024:मोदींच्या विरोधात मोर्चेबांधणीला सुरुवात, शरद पवारांनी बोलावली 15 विरोधी पक्षांची बैठक; 15 दिवसांत दुसऱ्यांदा प्रशांत किशोरांना भेटले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी 15 दिवसात दोनवेळा पवारांनी प्रशांत किशोर यांची भेट घेतली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मुठ बांधणे सुरू केले आहे. शरद पवारांनी सोमवारी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली आणि त्यानंतर मंगळवारी दुपारी 4 वाजता 'राष्ट्र मंच'ची बैठक बोलावली आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी ही बैठक होईल. मोदी सरकारच्या विरोधात 2018 मध्ये यशवंत सिन्हा यांनी राष्ट्र मंचची सुरुवात केली होती.

कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच सर्व विरोधी पक्ष फिजिकल मीटिंग करणार आहेत. राष्ट्र मंच अंतर्गत होणाऱ्या बैठकीत 15 विरोधी पक्षांचे नेते सामील होतील. बैठकीत यशवंत सिन्हा, आम आदमी पार्टीचे संजय सिंह, पवन वर्मासह अनेक नेत्यांचा सहभाग असू शकतो. शरद पवार पहिल्यांदाच राष्ट्र मंचच्या बैठकीत सहभाग घेणार आहेत. सध्या हा मंच राजकीय नाही, पण भविष्यात यातून तिसरी आघाडी तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यापूर्वी, शरद पवारांनी 15 दिवसांत दुसऱ्यांदा निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली आहे. 11 जूनला प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील घरी भेट घेतली होती. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली होती. त्या भेटीकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात शरद पवार सर्व विरोधकांना एकत्र आणत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

उद्याची बैठक का महत्वाची ?
1. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी सुरू करण्याती तयारी.

2. प्रशांत किशोर बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या विजयानंतर तिसऱ्या आघाडीचा चेहरा बनणार.

3. शरद पवार तिसऱ्या आघाडीचे समन्वयक असू शकतात.

बातम्या आणखी आहेत...