आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prashant Kishor Congress | Prashant Kishor On Congress Structural Weakness Over Lakhimpur Incident

प्रशांत किशोरांनी घेतला काँग्रेस कार्यकर्त्यांचा समाचार:निवडणूक रणनीतिकार म्हणाले - लखीमपूरच्या घटनेतून पक्ष मजबूत होईल ही अपेक्षा करणे व्यर्थ, त्यांच्याकडे स्वतःच्या समस्यांचे समाधान नाही

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रियंकाच्या मजबूत प्रतिमेमुळे काँग्रेस समर्थकांमध्ये आशा निर्माण झाली

8 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारानंतर राजकारण तापले आहे. यूपी निवडणुकीपूर्वी राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण विरोधक यूपीच्या योगी सरकारविरोधात मोर्चा काढत आहेत. दरम्यान, निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस समर्थकांचा खरपूस समाचार घेतला आहे.

त्यांनी ट्वीट करत म्हटले की, ज्यांना अशी अपेक्षा आहे की लखीमपूर खेरीच्या घटनेमुळे ग्रँड ओल्ड पार्टी (GOP), म्हणजे काँग्रेसचे नेतृत्त्व असलेले विरोधक मजबुतीने उभा राहील, त्यांना लोकांच्या हाती निराशा लागणार आहे. दुर्दैवाने, जीओपीच्या खोल समस्यांचे आणि त्याच्या ढाच्याच्या कमजोरीचे कोणतेही त्वरित समाधान नाही.

प्रियंकाच्या मजबूत प्रतिमेमुळे काँग्रेस समर्थकांमध्ये आशा निर्माण झाली
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियांका वड्रा बुधवारी रात्री उशिरा लखीमपूर खेरीला पोहोचले. येथे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. येथे त्यांनी शेतकरी लव्हप्रीत (20) च्या कुटुंबियांची भेट घेतली. लव्हप्रीतचे आई -वडील राहुल प्रियंकाला पाहून रडू लागले. यानंतर राहुल-प्रियांकाने लवप्रीतच्या आई-वडिलांचे सांत्वन करत मिठी मारली.

यापूर्वी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या घटनेनंतर लखीमपूर खेरीला रवाना झाल्या होत्या, परंतु उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर प्रियांकाला सीतापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले. गेस्ट हाऊसमध्ये प्रियांकाने झाडू लावून त्यांच्या अटकेचा निषेध केला होता.

3 ऑक्टोबर रोजी लखीमपूरमध्ये हिंसाचार झाला
रविवारी, 3 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवले होते. या दरम्यान एका कारने शेतकऱ्यांना चिरडले होते. यामुळे 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रासह 15 जणांविरोधात खुनाचा आणि गुन्हेगारी कट रचण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यात करार झाला. सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 45 लाखांची भरपाई दिली. एका सदस्याला या घटनेची न्यायालयीन चौकशी आणि 8 दिवसात आरोपींना अटक करण्यासह सरकारी नोकरीचे आश्वासन देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...