आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात सर्वांचे लक्ष्य पश्चिम बंगालवर होते. भाजपने बंगालमध्ये 200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा केला होता. पण, भाजपला शंभरचाही आकडा पार करता आला नाही. दरम्यान, तृणमूलचे निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, बंगालमध्ये भाजपने दोन अंकी आकडा पार केल्यावर मी माझा काम सोडून देईन.
दरम्यान आज समोर आलेले निकाल प्रशांत किशोर यांचा दावा खरा ठरवत आहेत. बंगालमध्ये भाजपला 100 चा आकडा पार करता आला नाही. बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तमिळनाडुमध्ये एमके स्टॅलिन यांच्या विजयाचे दावे खरे ठरुनही प्रशांत किशोर यांनी एका टीव्ही इंटरव्ह्यूदरम्यान म्हटले की, आता यापुढे I-PAC (त्यांची कंपनी) सोडण्याचा विचार करत आहे. आता प्रशांत यांना निवडणुकीसाठी रणनिती बनवायची नाही. त्यांच्या टीमने हे काम पुढे न्यावे, असेही ते म्हणाले.
जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, तुम्हाला आता राजकारणात यायचे आहे का. त्यावर ते म्हणाले- मला राजकारणात येण्याची इच्छा नाही. मी एक अपयशी राजकारणी आहे. यावेळी त्यांनी मिश्किल अंदाजात भविष्यात असममध्ये जाऊन चहाची शेती करणार असल्याचे म्हटले.
2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून मिळालेल्या पराभवानंतर 2020 मध्ये ममता बॅनर्जीचे भाच्चे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी प्रशांत किशोर यांना तृणमूलमध्ये घेऊन आले होते. यानंतर प्रशांत यांनी तृणमूलसाठी निवडणुकीची रणनिती बनवण्याचे काम सुरू केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.