आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prashant Kishor Rahul Gandhi | Political Strategist Prashant Kishor Meets With Rahul Gandhi In Delhi

सिद्धू-कॅप्टनचे भांडण सोडवणार का PK:सिद्धू यांनी आपमध्ये जाण्याचे संकेत देताच राहुल यांना भेटण्यासाठी पोहोचले अमरिंदर यांचे सल्लागार प्रशांत किशोर, निवडणुकीपूर्वी सामंजस्याचा प्रयत्न

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिद्धू यांनी ट्विट केले की, आप पक्षाने नेहमी त्यांच्या व्हिजनला ओळखले आहे

भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी मंगळवारी आपण आम आदमी पक्षामध्ये जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. सिद्धू यांनी ट्विट केले की, आप पक्षाने नेहमी त्यांच्या व्हिजनला ओळखले आहे, यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे. या ट्विटनंतर सुमारे तासाभरानंतर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे मुख्य सल्लागार प्रशांत किशोर राहुल गांधींना भेटण्यासाठी दिल्लीला पोहोचले.

रिपोर्ट्सनुसार, प्रियांका गांधी, पंजाब कॉंग्रेसचे प्रभारी हरीश रावत आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल हेही या बैठकीस उपस्थित होते. पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत सिद्धू आणि कॅप्टन यांच्यात सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी पीके यांची ही बैठक झाल्याचे मानले जात आहे. परंतु, अद्याप या बैठकीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पुन्हा यूपीच्या मुलाजवळ पीके, काय आहे गेम प्लान?

  • 2017 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाबरोबर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतिकार होते. त्यांनीच नारा दिला होता की, "UP के लड़के' और "UP को ये साथ पसंद है।' मात्र ही युती निवडणूक जिंकू शकली नाही. प्रशांत यांना वाटत होते की, या निवडणुकीमध्ये चेहरा प्रियंका असावी, पण असे झाले नसल्याचे समोर आले.
  • 2021 मध्ये प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या विजयासाठी योजना आखली. दावा करण्यात आला होता की, भाजप जर 100 आकड्यांच्या पार गेली तर निवडणूक रणनीति आखण्याचे काम सोडून देील. भाजपने 100 च्या आतच डाव गुंडाळला आणि प्रशांत किशोर यांचा दावा कायम राहिला.
  • आता प्रशांत किशोर हे अमरिंदर यांचे मुख्य सल्लागार आहेत आणि तेही अवघ्या एक रुपयांच्या पगारावर. पुढच्या वर्षी पंजाब निवडणुकाही आहेत. अशा परिस्थितीत त्यांची उपस्थिती कॉंग्रेससाठी मोठ्या दिलासाची बाब आहे, परंतु निवडणूकीच्या अगोदरच सिद्धू आणि अमरिंदर यांच्या संघर्षामुळे समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत याचे त्वरित निराकरण होणे आवश्यक आहे आणि यासाठी प्रशांत किशोरपेक्षा चांगले कुणीही नाही.
  • यूपीच्या निवडणुकीसंदर्भात प्रियंका गांधीही सक्रिय झाल्या आहेत. सोमवारीच त्यांनी उत्तर प्रदेशातील कॉंग्रेस नेत्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. दरम्यान राहुल-प्रियंकांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत की, यूपी निवडणुकीत प्रशांत किशोर यांची मोठी भूमिका असू शकते आणि हे लक्षात घेऊन कॉंग्रेस आपला खेळ आराखडा तयार करत आहे अशी शक्यता आहे.

PK यांनी म्हटले होते, विरोधकांच्या मोर्चात कोणतीच भूमिका नाही

  1. 11 आणि 21 जून रोजी प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनदा भेट घेतली. तेव्हा जूनमध्ये देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. नंतर पवारांसोबत मिळून ममता बॅनर्जी काही तरी डाव रचणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावेळी तिसऱ्या आघाडीविषयी बरीच चर्चा झाली होती.
  2. मात्र स्वतः प्रशांत किशोर आणि शरद पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. दोघांनी म्हटले होते की, काँग्रेस पक्षाशिवाय तिसऱ्या आघाडीचे कोणतेही अस्तित्व नाही. यानंतर 22 ला राष्ट्रमंचची बैठक झाली. याचे नेतृत्त्व तृणमूलचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी केले होते.
  3. राष्ट्रमंचच्या बैठकीमध्ये शरद पवार, नॅशनल कॉन्फ्रेंसचे फारुक अब्दुल्ला, आम आमदमी पक्षाचे संजय सिंह, सीपीआयचे डी राजा, राइटर जावेद अख्तर यांचा समावेश होता. बहुजन समाज पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस या बैठकीमध्ये सामिल झाले नव्हते.
  4. बैठकीनंतर तिसऱ्या आघाडीच्या प्रश्नावर प्रशांत किशोर स्पष्ट म्हणाले होते की, अशी कोणतीही तिसरी आघाडी मोदींना टक्कर देऊ शकत नाही. तेव्हा त्यांनी म्हटले होते की, 2024 च्या निवडणुकीत विरोधीपक्षाच्या मोर्चामध्ये त्यांची काहीच भूमिका नाही.
बातम्या आणखी आहेत...